breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘IIT, विद्यापीठात भाषणासाठी जातो तेव्हा संकोच वाटतो कारण..’; नितीन गडकरी

माझी इच्छा अभियंता होण्याची होती मात्र प्रवेश घेण्यासाठी अपात्र ठरलो

पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान, आयआयटी, अभियंता महाविद्यालय आणि विद्यापीठात भाषण देण्यासाठी जातो तेव्हा मला खूप संकोच वाटतो, असं विधान नितीन गडकरी यांनी केलं आहे. तसेच माझी इच्छा अभियंता होण्याची होती, असंही नितीन गडकरी म्हणाले.

नितीन गडकरी म्हणाले की, युट्युबवरून खूप फायदा होत आहे. मलाही फायदा होत आहे. मी कधीच विचार करून भाषण करत नाही. मी जास्त विद्वान व्यक्तीही नाही. मला सहावेळा डिलीट (डॉक्टरेट) मिळाली आहे. शाळेत असताना मी आणीबाणी विरोधात काम करत होतो. मला विज्ञानामध्ये ५२ गुण मिळाले होते. माझी इच्छा अभियंता होण्याची होती. पण मला ४९.२६ टक्के मिळाले होते. त्यामुळे मी अभियंता महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी अपात्र ठरलो.

हेही वाचा – ठरलं… जुलैमहिन्यात होणार मंत्रीमंडळाचा विस्तार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आता मी आयआयटी, अभियंता महाविद्यालय आणि विद्यापीठात भाषण देण्यासाठी जातो. तेव्हा मला खूप संकोच वाटतो. कारण, मी इंजिनिअरिंगसाठी अपात्र ठरलो. तर, मी काय भाषण करणार आहे. आता मला सहा डिलीट मिळाल्या आहेत. चार महाराष्ट्राच्या आणि दोन तमिळनाडूच्या आहेत. पण, मी कधी डॉक्टर लिहीत नाही. इंजिनिअरिंगसाठी अपात्र ठरलो असून डॉक्टर कसे लावू याचा संकोच वाटतो. श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, तुकडोजी महाराज यांना कोणती डिलीट मिळाली नव्हती. पण, त्यांचे विचार अबाधित आहेत, असंही नितीन गडकरी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button