Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडी

RBI चा मोठा निर्णय! इंटरनेट नसेल तरी देखील ऑफलाइन पद्धतीने करता येणार ‘इतक्या रुपयांपर्यंत’ पेमेंट

RBI : आजकाल सर्वचजण आर्थिक व्यवहार डिजिटल पद्धतीने करतात. यासंदर्भात आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची यूपीआय संबंधित एक बैठक पार पडली. या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. याविषयी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी माहिती दिली आहे. आता RBI ने UPI Lite वरील व्यवहार मर्यादा वाढवली आहे. RBI ने UPI Lite ची मर्यादा २०० रुपयांवरून ५०० रुपये केली आहे. म्हणजेच आता UPI Lite धारकांना तुम्ही PIN न टाकता UPI Lite द्वारे एकावेळी ५०० रुपये पेमेंट अगदी सहजरित्या करू शकता.

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिजिटल पेमेंटचा अनुभव वाढवण्यासाठी UPI Lite ची मर्यादा वाढविण्यात आली आहे. जेणेकरून प्रत्येकजण UPI Lite चा वापर करू शकेल. तसेच या फीचर्सद्वारे तुम्ही तुमच्या UPI Lite वॉलेटमध्ये एका दिवसात एकूण ४००० रुपये जोडू शकता.

हेही वाचा – अजित पवार आणि शरद पवार यांची भेट; जयंत पाटील म्हणाले..

असं वापरता येणार UPI Lite :

  • UPI Lite तुम्ही Phone pay, Google pay आणि Paytm या अॅप सुरु करू शकता.
  • त्यासाठी तुम्हाला Setting मध्ये जाऊन UPI ​​Lite या पर्यायावर जावा लागेल.
  • त्यानंतर पुढे तुम्हाला तुमची बँक निवडायची आहे. त्यानंतर अकाऊंट Activate करायचं आहे.
  • तुमचं अकाऊंट Activate झाल्यानंतर पेमेंट करताना UPI Lite हा पर्याय निवडायचा आणि त्याद्वारे पेमेंट करा.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button