Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान नाही’; सीमा हैदरला मनसेचा इशारा

मुंबई : पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर हिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. निर्माते अमित जानी यांनी तिच्या प्रेमकथेवरून चित्रपट बनवणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, यावरून महाराष्ट्र नवनिर्मान चित्रपट सेनेने त्यांना इशारा दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे की, पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या.

हेही वाचा – RBI चा मोठा निर्णय! इंटरनेट नसेल तरी देखील ऑफलाइन पद्धतीने करता येणार ‘इतक्या रुपयांपर्यंत’ पेमेंट

आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर राडा तर होणारच, असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button