Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

युद्ध संपले! अमेरिका-इराणमध्ये अखेर ऐतिहासिक शांतता करार; हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली

America Iran Peace Treaty | गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम आशियात धगधगत असलेल्या युद्धाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध संपवण्यासाठी एक ऐतिहासिक शांतता करार (MoU) झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्याची माहिती समोर आली आहे.

फ्रान्समध्ये पार पडलेल्या ‘जी-७’ (G7) परिषदेच्या सांगता समारंभात बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या कराराची घोषणा केली. “या अंतरिम करारामुळे जगावरील मोठे आर्थिक संकट टळले आहे. गेल्या तीन दिवसांत ‘हॉर्मुझच्या सामुद्रधुनी’तील सागरी वाहतूक कमालीची वाढली असून, मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल आहे,” असे ट्रम्प म्हणाले.

नेमके काय आहे या ऐतिहासिक करारात?

या कराराचे मसुदे समोर आले असून त्यानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर खालील प्रमुख घडामोडी घडणार आहेत:

जलमार्ग मोकळा: करारावर स्वाक्षरी होताच इराण आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’चा सागरी मार्ग तातडीने पूर्णपणे मोकळा करेल.

कच्च्या तेलाची विक्री: इराणला आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा कोणत्याही निर्बंधांशिवाय कच्च्या तेलाची विक्री करण्याची परवानगी मिळेल.

पुनर्उभारणीसाठी मोठे पॅकेज: युद्धानंतर इराणच्या पुनर्उभारणीसाठी सुमारे ३०० अब्ज डॉलर्सचे (सुमारे २५ लाख कोटी रुपये) आर्थिक पॅकेज दिले जाण्याची शक्यता आहे.

निर्बंध हटणार: इराणच्या अणू कार्यक्रमावर अंतिम तोडगा निघाल्यास, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र इराणवरील सर्व आर्थिक निर्बंध मागे घेतील.

हेही वाचा

‘स्टेट सीएसआर’ कक्षाच्या निर्मितीतून स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी येणाऱ्या निधीचा विनियोग करा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

करारातील महत्त्वाचे मुद्दे

या शांतता करारात एकूण १४ प्रमुख कलमांचा समावेश आहे. त्यानुसार, लेबनॉनसह सर्व युद्धे तातडीने बंद केली जातील. अमेरिका इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही आणि ३० दिवसांच्या आत इराणजवळील नौदलाची नाकेबंदी पूर्णपणे हटवली जाईल. तसेच अमेरिकेचे सैन्य इराणच्या कोणत्याही भागातून पूर्णपणे बाहेर पडेल. या बदल्यात इराण अणुशस्त्रे न बनवण्याबाबतच्या आपल्या (NPT) नियमांचे पालन करेल. इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि तिथल्या स्थानिक रेझिस्टन्स ग्रुप्सना मिळणारा पाठिंबा मात्र या कराराचा भाग नाही.

६० दिवसांचा अवधी आणि अंतिम बोलणी

स्वाक्षरीनंतर दोन्ही देशांना अंतिम वाटाघाटींसाठी ६० दिवसांचा वेळ मिळणार आहे. या काळात ६० दिवसांमध्ये इराणचे गोठवलेले २४ अब्ज डॉलरवरील निर्बंध हटवले जातील. या निश्चित कालावधीत इराणचा अणू कार्यक्रम, शिल्लक असलेले आर्थिक निर्बंध आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या नियमांवर सविस्तर चर्चा होऊन अंतिम करार केला जाईल. इराणने नियमांचे उल्लंघन केल्यास पुन्हा भीषण कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराही ट्रम्प यांनी त्यांच्या आक्रमक शैलीत दिला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button