breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अजित पवार आणि शरद पवार यांची भेट; जयंत पाटील म्हणाले..

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात गुप्त भेट झाली. या भेटीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, यावरून जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम होण्याचा प्रश्न नाही. लोक एकमेकांना भेटत असतात. विशेष सांगण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही. ती गुप्तबैठक नव्हतीच ती. मी पवारसाहेबांसोबत गेलो आणि मी तिथून निघून आलो. बैठकीत काय झालं हे मला माहित नाही. बातम्या पेरल्या जातात असं मला वाटतंय. आता हे कोण करतंय ते तुम्हीच हुडकून काढा.

हेही वाचा – BCCI क्रिकेट बोर्ड जगातील सर्वात श्रीमंत, पाच वर्षांत २७,००० कोटींहून अधिक कमाई

माझी भूमिका मी याआधीच स्पष्ट केलं. ईडी आणि गुप्तभेटीचा काही संबंध नाही. निकटवर्तीयांना म्हणजे माझ्या बंधुंना ईडीची नोटीस आली.एका कंपनीबाबत त्यांना माहिती विचारण्यात आली. चार दिवसांपूर्वीच ते जाऊन आले. ईडीला आवश्यक ती माहिती दिवी. त्याचा आणि भेटीचा संबंध लावण्याची गरज नाही, असं जयंत पाटील म्हणाले.

सगळेच शरद पवार यांचा फोटो लावतात. सगळेच आम्ही शरद पवारांसाठी काम करतोय असं सांगतात, त्यामुळे अजून तरी फूट नजरेत नाही, असंच शरद पवारांनी निवडणूक आयोगाला कळवलं आहे. मी मंत्रिमंडळात दिसणार अशा चर्चा कायम चालू असतात. प्रत्येक आमदार कधीही मंत्री बनू शकतो, अशा आशयाच्या बातम्या लावत असतात, त्या तुम्ही मनावर घेऊ नका, असंही जयंत पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button