महाराष्ट्रात ३ हजारहून अधिक तिरंगा रॅलीचे आयोजन
भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रॅली

नागपूर : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत सैन्य दलाच्या समर्थनार्थ आणि भारतीय जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी राज्यभर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या महायुतीचे तिन्ही नेते पक्षाचे सर्वसाधारण कार्यकर्त्यांसह सर्व आमदार सहभागी होणार आहे. पुढील पाच दिवसांत पालकमंत्री, संपर्कमंत्री तीन हजारच्यावर रॅली काढणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
भारताचे सैनिक पाकिस्तान विरोधात युद्ध करत आहे. भारताचा तिरंगाच्या विजयी करण्यासाठी लढत आहेत. त्या सैनिकांचा पाठीशी भारताची १४० कोटी जनता आणि महाराष्ट्रातील १४ कोटी जनता ताकदीने पाठीशी आहे.
हेही वाचा – महावितरणकडून शहरात मॉन्सूनपूर्व कामांना वेग
या युद्धामध्ये भारतीय सेनेला प्रचंड पाठबळ मिळावे याकरिता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि आमचे तिन्ही पक्षाचे कार्यकर्ता तिरंगा रॅली काढणार आहे. हा काही शिवसेना किंवा भाजपचा पक्षाचा कार्यक्रम नसल्याचेही त्यांनी सांगितले.
सरकारमधील महायुतीतील सगळे मंत्री, आमदार आपापल्या जिल्ह्यामध्ये, मतदारसंघ, तालुक्यामध्ये एक सर्वपक्षीय आवाहन करून सर्व समाजातील प्रतिष्ठित सर्व समाजातील लोकांना या तिरंगा यात्रेत सहभागी करून घेणार आहेत.
भारतीय नागरिक म्हणून सेनेच्या पाठीशी उभे करणे ही नागरिक म्हणून जवाबदारी आहे. यात देशभक्तिपर कार्यक्रम सुद्धा आयोजन केले जाणार आहे. दोन ते तीन हजार नागरिक या तिरंगा रॅलीत प्रत्येत तालुका, जिल्हांसह सर्वत्र सहभागी होईल असेही बावनकुळे म्हणाले.