ताज्या घडामोडीविदर्भ विभाग

युद्धाची ठिणगी पडल्यानंतर शेअर बाजार दीड ते तीन टक्क्यांनी उतरला

ऑपरेशन सिंदूरनंतर शेअर बाजारात घसरण

सोलापूर : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननेही हल्ले सुरू केल्याने युद्धाची ठिणगी पडल्यानंतर शेअर बाजार दीड ते तीन टक्क्यांनी उतरला आहे. प्रत्यक्षात चकमकीच्या पलीकडे जाऊन एलओसीवर युद्ध होईल तेव्हाच त्याचे दीर्घ परिणाम बाजारावर उमटू शकतात. हे परिणाम देखील गुंतवणुकीच्या संधी निर्माण करणारे असतील.

दोन दिवसांपासून भारत व पाकिस्तानमध्ये बॉर्डरवर चकमकी सुरू आहेत. पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जीकल स्ट्राईक देखील परिणामकारक ठरला आहे. या चकमकी आणखी वाढल्यास युद्ध होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

दोन दिवसांपासून शेअर बाजारात छोटी घसरण झाली आहे. यापूर्वी युद्धाच्या घटना घडल्यानंतर त्याचा शेअरबाजाराला फटका बसतो. मात्र युद्ध ही अल्पकालीक घटना आहे. त्याचे परिणाम देखील अल्पकालीक असतात. त्यामुळे या कालावधीतील शेअर बाजाराची घसरण गुंतवणुकीची संधी होते, असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा –  महावितरणकडून शहरात मॉन्सूनपूर्व कामांना वेग

सोने लाखावर
दरम्यान, आज सोन्याचे भाव २४ कॅरेट सोने ९७ हजारांवर असून जीएसटीसह हा दर १ लाख रुपयावर आहे. हा दर सर्वाधिकच आहे. भारत व पाकिस्तान युद्धात सोने व्यापाराचा फारसा संबंध येत नाही. मात्र युद्ध चिघळून अर्थकारणावर परिणाम करणारे ठरले तर आणखी पाच ते दहा हजार रुपये वाढ होऊ शकते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

सध्या भारत व पाकमध्ये चकमकी सुरू आहेत. ही स्थिती अधिकच बिघडत गेली तर शेअर बाजार आणखी घसरू शकतो. त्यामुळे पुढील आठवडा हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

– दत्तप्रसाद डांगे, गुंतवणूक सल्लागार, सोलापूर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button