ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘दादां’ना भावपूर्ण अभिवादन करण्यासाठी कृतज्ञता मेळावा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांची माहिती

पिंपरी-चिंचवड । बारामती आणि पिंपरी-चिंचवड हे केवळ भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळे भाग नसून, एकमेकांशी घट्ट नात्याने जोडलेले कुटुंब असल्याची भावना पुन्हा एकदा अधोरेखित करणारा ‘कृतज्ञता मेळावा’ शनिवारी, दि. १८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे पार पडणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात मोलाचा वाटा उचलणारे आणि जनमानसात अढळ स्थान निर्माण करणारे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने बारामती मित्र मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

हेही वाचा     :                पुनावळ्यात नदी स्वच्छता मोहिमेत निष्काळजीपणा  

दादांनी शहराच्या विकासासाठी दिलेली दृष्टी, तसेच सर्वसामान्यांसाठी लढण्याची त्यांची जिद्द आजही नागरिकांच्या मनात जिवंत असल्याचे आयोजकांनी नमूद केले. त्यांच्या पश्चात बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार निवडणुकीच्या रिंगणात असून, ही लढत केवळ राजकीय नसून दादांच्या विकासपरंपरेला पुढे नेण्याची भावनिक जबाबदारी असल्याची भावना व्यक्त होत आहे.

नागरिकांना आवाहन…

या मेळाव्यात पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झालेल्या बारामतीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा केवळ राजकीय कार्यक्रम नसून, दादांबद्दलच्या भावना व्यक्त करण्याचे व्यासपीठ असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष योगेश बहल यांनी, “दादांनी शहराला दिलेल्या वैभवाची परतफेड त्यांच्या विचारांना बळ देऊन आणि नेतृत्वाला साथ देऊनच करता येईल,” असे सांगत नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच बारामती मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही सर्व बारामतीकरांना या मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button