Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महावितरणकडून शहरात मॉन्सूनपूर्व कामांना वेग

पिंपरी चिंचवड :मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर पावसाळीपरिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे वेगाने सुरू आहेत. मे महिन्याच्या अखेरीस सर्व कामेपूर्ण करण्यात येणार आहेत. महावितरण व महापारेषणकडून होणाऱ्या कामाचा
फटका ग्राहकांना बसत असून, रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याचेप्रकार वाढत आहेत. त्यामुळे त्याची पूर्वकल्पना द्यावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

वीजसुरक्षेचे धोके टाळण्यासाठी ग्राहकांना पूर्वसूचना देऊन देखभाल वदुरुस्तीचे कामे प्रामुख्याने दर गुरुवारी करण्यात येत आहेत, अशी महावितरणकडून सांगण्यात येत आहे. दुरुस्तीच्या कामांमध्ये प्रामुख्यानेवीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या छोट्या फांद्या तोडणे, तूटलेले पीन व डिस्क इन्सूलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रे, फिडर पिलर, रिंगमेन युनिटचे अर्थिंग तपासणे, ऑइल फिल्टरेशन व ऑइल टॉपिंग अप, रोहित्राच्या वितरण पेटीची दुरुस्ती, नादुरुस्त लाईटनिंग अरेस्टर बदलणे, वीजखांब व तारांचे मजबुतीकरण, तारांमधील झोल काढणे, गंजलेले किंवा खराब झालेले वीजखांब बदलणे, जुन्या वीजतारा बदलणे, फिडर पिलरची साफसफाई व आवश्यकतेनुसार इन्सूलेशन स्प्रे मारणे, उच्च व लघुदाब वीजतारांना गार्डिंग करणे यासह उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, पॉवर ट्रान्सफॉर्मरची देखभाल व ऑइल टॉपिंगअप अशा व इतर विविध दुरुस्ती कामांसह वीजपुरवठ्याच्या पर्यायी यंत्रणा सज्ज करणे आदी कामे करण्यात येत आहेत.

हेही वाचा –  चिखली-पाटीलनगर येथील वाहतुकीला अडथळा ठरणार ट्रान्सफार्मरचे स्थलांतर!

भोसरी, पिंपरी चिंचवड व तळवडे एमआयडीसी, भोसरी, देहू, मोशी, चिखलीचा काही परिसर या भागात पूर्वमाहिती देऊन वीजयंत्रणेचे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीचे कामे करण्यात आली.दरम्यान, या कामांमुळे विशेषत रात्रीच्या वेळी उपनगरातील होणारा वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळयाच्या काळात नागरिकांना उकाडा सहन करावा लागतो.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button