ताज्या घडामोडीमुंबईराजकारण

भारताचा दिग्गज आणि मराठमोळा क्रिकेटपटू केदार जाधवचा भाजपात जाहीर प्रवेश

केदार जाधवचे भापजात येणे हे आमच्यासाठी खूप आनंद देणार आहे, असे म्हणत बावनकुळे यांनी केदाज जाधवचे स्वागत

मुंबई : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या शहरांत आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सर्वच प्रमुख पक्षांकडून केला जात आहे. आज (8 एप्रिल) भाजपात अन्य पक्षांच्या अनेके नेते तसेच पदाधिकाऱ्यांनी भाजपाता जाहीर प्रवेश केला. विशेष म्हणजे कधीकाळी क्रिकेटचे मैदान गाजववलेल्या भारताचा दिग्गज आणि मराठमोळा क्रिकेटपटू केदार जाधव यानेदेखील भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

मुंबईतील कार्यक्रमात केला भाजपात प्रवेश
क्रिकेटच्या मैदानावर धावांचा पाऊस पाडणाऱ्या केदार जाधवने आता भाजपात प्रवेश केल आहे. भाजपात सामील होत त्याने आपली राककीय इनिंग सुरू केली आहे. मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रेदार जाधव याने मंत्री तथा भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केल आहे. केदार जाधवचे भापजात येणे हे आमच्यासाठी खूप आनंद देणार आहे, असे म्हणत बावनकुळे यांनी केदाज जाधवचे स्वागत केले.

हेही वाचा  :    विराट कोहलीने रचला इतिहास: टी-२० क्रिकेटमध्ये १३ हजार धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज

गेल्या वर्षी केली होती निवृत्तीची घोषणा
केदार जाधवने गेल्या वर्षाच्या जून महिन्यात क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. याबाबतची माहिती त्याने सोशल मीडियावर सार्वजनिक केली होती. 39 वर्षीय केदार जाधवने त्याचा शेवटचा सामने 2020 सालातील फेब्रुवारी महिन्याय न्यूझिलंडविरुद्ध खेळला होता.

कसं आहे केदार जाधवचं करिअर?
केदार जाधवने 2014 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केला. त्याने आपला पहिला एकदिवसीय सामना रांचीमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. त्याने एकूण 73 एकदिवसीय सामन्यांत 42.09 च्या सरासरीने एकूण 1389 धावा केल्या. केदार जाधवने एकदीवसीय सामन्यांत दोन शतकं तसेच सहा अर्धशतकं केलेली आहेत. विशेष म्हणजे केदार जाधवच्या नावावर एकूण 27 बळी आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये केदार जाधवने 123.23 च्या सरासरीने एकूण 58 धावा केलेल्या आहेत.

केदार जाधवला काय जबाबदारी मिळणार?
दरम्यान, केदार जाधवने भाजपात प्रवेश केला असला तरी त्याच्यावर पक्ष नेमकी कोणती जबाबदारी सोपवणार हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे आगामी काळात राजकारणाच्या आखाड्यात केदार जाधव नेमकी काय भूमिका पार पाडणार? राजकारणातही तो क्रिकेटच्या मैदानाप्रमाणेच जोरदार बॅटिंग करणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button