भारताचे हवाईहल्ले रोखण्यासाठी, चिनी क्षेपणास्त्रे,सध्या पाकड्यांकडे!

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या हवाई दलाने आणि नौदलाने अरबी समुद्रात युद्धसराव सुरू केला आहे. त्यामुळे पाकड्यांच्या उरात धडकी भरली असून प्रचंड घबराट पसरली आहे. काहीनेत्यांनी तर कॅनडाला जाऊन तेथे आश्रय देखील घेतला आहे.
भारताच्या युद्ध सज्जतेने धडकी..
एकूणच भारताची युद्ध सामग्री पाहून पाकिस्तानच काय, त्यांचा आश्रयदाता चीन सुद्धा हादरला आहे. भारताच्या विमानांविरोधात वापरण्यासाठी चीन पाकिस्तानला काही क्षेपणास्त्रे देऊ शकतो. भारताच्या राफेलच्या तुलनेत चीनकडे कोणती क्षेपणास्त्रे आहेत ?, याची गोपनीय माहिती भारतीय गुप्तचरांनी काढली आहे.
वाकड्यांना युद्धाचे गांभीर्य नाही..
पाकड्यांचे लष्कर, हवाई दल आणि नौदल भारताच्या सीमेजवळ सराव करत आहे. पण त्यांना अजून लढायचे गांभीर्य आलेले नाही. त्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ रणगाडे आणण्यापासून ते लढाऊ विमानांच्या क्षेपणास्त्रांसह गस्त घालणे आणि समुद्रात नौदलाच्या ‘लाईव्ह फायर ड्रिल’ चाही समावेश आहे.
चिनी क्षेपणास्त्रे भारताच्या दिशेने..
पाकड्यांच्या लष्कराची रोजच आगळीक दिसत असून रात्री बारा वाजता त्यांच्याकडून गोळीबार होत आहे. पाकिस्तानी हवाई दलाची लढाऊ विमाने चिनी क्षेपणास्त्रांसह उडत आहेत. भारत पुन्हा ‘एअर स्ट्राईक’ करणार तर नाही ना, अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे, त्यांचे लष्करप्रमुख आणि पंतप्रधान उघडपणे ही भीती व्यक्त करीत आहेत.
कोणकोणती चिनी क्षेपणास्त्रे..
भारतीय हवाईदलाच्या राफेल लढाऊ विमानांच्या उड्डाणांमुळे पाकिस्तानी हवाईदल अडचणीत आले आहे. त्यामुळेच भारताच्या राफेलला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने चीनकडून हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे खरेदी (?) केली आहेत. भारताच्या राफेलचा मुकाबला करण्यासाठी चीनकडे कोणती क्षेपणास्त्रे आहेत, ज्यावर पाकिस्तान उड्या मारत आहे.
हेही वाचा – सोमवारी जाहीर होणार बारावीचा निकाल, कुठल्या वेबसाईटवर पाहता येणार निकाल?
पाहू तर कोणती क्षेपणास्त्रे?
त्यांच्याकडे असलेले पीएल – ८ क्षेपणास्त्र इस्रायलच्या पायथन-३ क्षेपणास्त्राची नक्कल मानले जाते. राफेल अॅडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टीमने पायथन-३ विकसित केले आहे. चीनचे पीएल-८ क्षेपणास्त्र त्यावेळी इस्रायलच्या सहकार्याने तयार करण्यात आल्याचा दावा अनेक तज्ज्ञांनी केला आहे. हे क्षेपणास्त्र मॅक ३.५ मॅक वेगाने उड्डाण करण्यास सक्षम आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता २० किलोमीटर आहे.
पीएल- १० ची मर्यादित रेंज..
पीएल- १० क्षेपणास्त्राची मर्यादित रेंज लक्षात घेऊन चीनने पीएल- ८ क्षेपणास्त्राची निर्मिती केली. याला पीएल-अॅडव्हान्स्ड शॉर्ट रेंज मिसाईल म्हणूनही ओळखले जाते. चीनच्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांपैकी हे सर्वात प्रगत क्षेपणास्त्र आहे. त्याची तुलना अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांशी केली जाते. हे क्षेपणास्त्र ९० अंशाच्या कोनातही फिरण्यास सक्षम असल्याचा चीनचा दावा आहे. ‘इमेजिंग इन्फ्रारेड’ ने सुसज्ज असल्याने हे क्षेपणास्त्र आपले लक्ष्य अधिक चांगल्या प्रकारे ओळखते.
पीएल-१२ चा हवेतून हवेत मारा..
पीएल- १२ हे हवेतून हवेत मारा करणारे सक्रिय रडार गाईडेड व्हिज्युअल रेंज (बीव्हीआर) क्षेपणास्त्र आहे. चीनच्या या क्षेपणास्त्राची तुलना अमेरिकन एआयएम- १२० एएमआरएएएम आणि रशियन आर-७७ शी करता येईल. या क्षेपणास्त्राच्या विकासासाठी वायम्पेल एनपीओ आणि रशियाच्या अगेट यांनी मदत केली आहे. हे क्षेपणास्त्र चिनी लढाऊ विमान जेएच-7, जे-8 एफ, जे-10, जे-11 बी, जे-15, सीएसी/पीएसी जेएफ-17 आणि एफटीसी-2000 जी मधून प्रक्षेपित केले जाऊ शकते.
रडार गाईडेड पीएल-१५.
पीएल-१५ हे हवेतून हवेत मारा करणारे सक्रिय रडार गाईडेड क्षेपणास्त्र आहे. चीनला हे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या एआयएम- १२० डी सारखे बनवायचे होते. पीएल-१५ हे लुओयांगस्थित कामा कंपनीने विकसित केले आहे. हे क्षेपणास्त्र चेंगदू जे- १० सी, शेनयांग जे-१६ आणि चेंगदू जे-२० लढाऊ विमानांवर तैनात करण्यात आले आहे. ड्युअल पल्स रॉकेट मोटरने सुसज्ज असल्याने या क्षेपणास्त्राची रेंज आणि वेग चांगला आहे. पीएल-१५ क्षेपणास्त्राची मारक क्षमता २०० किलोमीटरपेक्षा जास्त आहे. हे क्षेपणास्त्र इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्कॅन केलेले आणि रडार साधकाने सुसज्ज आहे.
पीएल-१७ क्षेपणास्त्र आणि दहशत..
चीनच्या पीएल-१७ क्षेपणास्त्राविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. याला पीएल-वीस असेही म्हणतात. हवेतून हवेत मारा करणारे हे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र शत्रूच्या हवाई इंधन भरणाऱ्या आणि अवॉक्स विमानांना लक्ष्य करण्यासाठी खास डिझाइन करण्यात आले आहे, जे त्यांच्या हवाई हद्दीत चांगले कार्य करतात. चीनने हे क्षेपणास्त्र गुप्त शस्त्र म्हणून सुरक्षित ठेवले आहे आणि त्याची दहशत प्रचंड आहे.
क्षेपणास्त्रे आहेत, पायलट भयभीत..
चीनने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रांचा पुरवठा केला असला तरी ती डागण्याची क्षमता असणारे तज्ज्ञ पायलट पाकिस्तानकडे आहेत का हा खरा प्रश्न आहे. पण एकूणच परिस्थिती पाहता आणि भारताची युद्धसज्जता पाहता पाकड्यांची घाबरगुंडी उडाली आहे, हे मात्र नक्की !