ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

रोहित शर्माचा खुलासा अभिनेत्री करीना कपूर हिच्यावर फिदा

मी तिच्यासाठी वेडा होतो,तिचा प्रत्येक सिनेमा पाहिला आहे, तेव्हा करीना माझी क्रश होती

मुंबई : अभिनेत्री करीना कपूर हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत करीना हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज वयाच्या 43 व्या वर्षी देखील करीना कपूर हिची चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ कमी झालेली नाही. बॉलिवूडमध्ये करियर करत असताना करीना फत्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत राहिली. आज करीना तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे, पण अनेक प्रसिद्ध अणि लोकप्रिय सेलिब्रिटींसोबत करीनाच्या नावाची चर्चा रंगली. तर अनेकांनी करीना बद्दल मनात असलेली भावना व्यक्त केली.

करीना हिच्याबद्दल भावना व्यक्त करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. या यादीमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन रोहित शर्मा याचा देखील समावेश आहे. एका मुलाखतीत रोहित शर्मा याने करीनाबद्दल भावना व्यक्त केल्या. सांगायचं झालं तर, आज करीना हिचा वाढदिवस असल्यामुळे तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे.आज अभिनेत्री आणि क्रिकेटर त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. पण तरी देखील रिलेशनशिपच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. एक काळ असा होता जेव्हा रोहित शर्मा एका बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हिच्यावर फिदा होता. याचा खुलासा खुद्द अभिनेत्याने केला आहे.

2014 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत रोहित शर्मा याने बॉलिवूडसोबत असलेल्या नात्याबद्दल सांगितलं आहे. रोहित शर्मा म्हणाला होता, मी मधुबाला, वहीदा रहमान, किशोर कुमार, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचे सिनेमा पाहात मोठा झालो आहे.यावेळी रोहित याला आवडती अभिनेत्री कोण असा प्रश्न देखील विचारण्यात आला. तेव्हा रोहित याने अभिनेत्री करीना कपूर हिचं नाव घेतलं.करीना कपूर हिच्याबद्दल रोहित म्हणाला, मला करीना कपूर आवडते. मी तिच्यासाठी वेडा होतो. मी तिचा प्रत्येक सिनेमा पाहिला आहे. तेव्हा करीना माझी क्रश होती, असं देखील रोहित शर्मा म्हणाला होता. रोहित बद्दल ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे.

करीना कपूर आणि सैफ अली खान
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी लग्न केलं. आज करीना कपूर आणि सैफ अली खान एकमेकांसोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. करीना – सैफ यांच्या मोठ्या मुलाचं नाव तैमूर आणि लहान मुलाचं नाव जेह असं आहे. करीना कायम मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button