प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल जाहीर; राज्यात ९१.८८ टक्के निकाल

HSC Result 2025 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर सोमवारी करण्यात आला आहे. राज्याचा बारावीचा निकाल यंदा ९१.८८ टक्के लागला आहे. यंदाही बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल राहिला, तर लातुर विभागाचा खालून पाहिला नंबर लागला आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून mahahsscboard.in, hscresult.mkcl.org, education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results आणि results.digilocker.gov.in या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन निकाल पाहता येतील. तर, महाविद्यालयांना आवश्यक कॉलेज लॉग-इनसह mahahsscboard.in वर एकत्रित निकाल पाहता येतील.
हेही वाचा : ‘आयआयसीटीला जागतिक कंपन्यांचे सहकार्य’; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे प्रतिपादन
बारावीचा विभागनिहाय निकाल
- कोकण – ९६.१४
- छत्रपतीसंभाजी नगर – ९२.२४
- मुंबई – ९२.९२
- पुणे – ९१.३२
- कोल्हापूर – ९३.६४
- लातूर – ८९.४६
- अमरावती – ९१.४३
- नागपूर – ९०.५२
- नाशिक – ९१.३१
निकाल कसा पाहायचा?
- mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- HSC Examination Result २०२५लिंकवर क्लिक करा
- तुमचा Roll Number आणि आईचं नाव (Mother’s Name) टाका
- View Result बटणावर क्लिक करा.