लाडक्या बहिणींनो जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana | जुलै महिना संपत आला तर अद्याप राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात या महिन्याचा हफ्ता जमा झालेला नाही. त्यामुळे जुलैचा हफ्ता येणार की नाही? अशी चर्चा महिलांमध्ये सुरू झाली आहे. अशातच राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे.
जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्र पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रूपये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मिळणार असल्याची माहिती सूत्रांची आहे. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींची रक्षाबंधन यंदाही आनंदात साजरी होणार असल्याचे दिसंतय.
हेही वाचा : इस्रो-नासा यांचा 13000 कोटींचा उपग्रह अवकाशात झेपावला; पृथ्वीचे हाय रिझोल्युशन निरीक्षण शक्य
९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. त्यामुळे रक्षाबंधनचा मूहूर्त साधत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. जर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात किंवा एखाद्या सणाचा मूहूर्त साधत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. ऑगस्ट महिन्यात बहिणींचा म्हणजे रक्षाबंधन सण आहे. त्यामुळे याच दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात.
अशातच लाडकी बहीण योजनेमधील २६ लाख अर्जांची पडताळणी करून सरकार त्यावर योग्य ती कारवाई करणार आहे. म्हणजेच ज्यांनी चुकीची माहिती दिली असेल किंवा काही तांत्रिक अडचणी आल्या असतील असे २६ लाख अर्ज सरकार तपासणार आहे. मात्र तसं असेल तर निवडणुकांच्या तोंडावर इतके लाखो अर्ज मंजूर कसे झाले ? त्यावर सरकार काहीही बोलत नाही असं म्हणत विरोधकांनी सरकारला घेरलंय.





