पिंपरी / चिंचवड

एमबीबीएसला प्रवेश देण्याचे आमिष दाखवून 45 लाखांची फसवणूक : कॉलेज प्रमुखासह दोघांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी

एमबीबीएस या वैद्यकीय शाखेच्या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची 45 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 7 ऑगस्ट 2016 ते 25 नोव्हेंबर 2021 या कालावधीत एच ए कॉलनी वल्लभनगर पिंपरी येथे घडला.

किरण सुवर्णा (रा. पिंपरी), आय एस एन आर कॉलेजचे प्रमुख देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने सोमवारी (दि. 7) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीला वैद्यकीय शाखेच्या एमबीबीएस या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याचे आरोपींनी आमिष दाखवले. त्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून तब्बल 45 लाख रुपये घेतले. पैसे घेऊन आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलीला एमबीबीएसला प्रवेश दिला नाही. तसेच फिर्यादी यांचे पैसे देखील परत केले नाहीत. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार पतंगे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button