ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

सिल्व्हर-९ सोसायटीलगतचे कचरा संकलन केंद्राचे काम अखेर थांबविवले!

सोसायटी फेडरेशनच्या तगाद्याला मिळाले यश; पालिका प्रशासनाचे आमदार लांडगेंना पत्र

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा मोशी येथील सिल्वर-9 सोसायटीजवळ कचरा संकलन केंद्र उभारण्याचा प्रकल्प बांधणीचे काम अखेर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

चिखली-मोशी-चऱ्होली पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेनच्या तगद्यासमोर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सोसायटीधारकांना दिलासा मिळाला आहे.

प्रस्तावित कचरा संकलन केंद्राला स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता. सुमारे ५ हजार लोकवस्ती असलेल्या परिसरात कचरा संकलन केंद्र करुन नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण करु नये, अशी मागणी चिखली-मोशी-चऱ्होली पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी केली होती. तसेच, या केंद्राबाबत प्रशासनाविरोधात आंदोलनाचाही इशारा दिला होता.

दरम्यान, सोसायटी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली होती. यावर आमदार लांडगे यांनी ‘‘लोकवस्तीच्या ठिकाणी कचरा संकलन केंद्र नकोच..’’ अशी सूचना महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना केली होती. यावर प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी याच परिसरातील तीन पर्यायी जागांचा शोध घेतला. त्यावर कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने सिल्वर-9 सोसायटीजवळील प्रस्तावित कचरा संकलन केंद्राचे काम सद्यस्थितीत थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरात ठिकठिकाणी कचरा संकलन केंद्र उभारण्याबाबत प्रशासनाने पुढाकार घेतला होता. मात्र, लोकवस्तीमध्ये किंवा नागरी आरोग्याच्या तक्रारी येतील, अशा ठिकाणी कचरा संकलन केंद्र उभारू नये, अशी आमची मागणी होती. याबाबत आमदार महेश लांडगे यांनाही आम्ही सांकडे घातले. त्यांनी आमच्या मागणीला पाठिंबा दिला. प्रशासनाने सदर कचरा संकलन केंद्र बांधणीचे काम थांबवण्याचा निर्णय घेतला याबद्दल आयुक्त शेखर सिंहसाहेब आणि आमदार महेश लांडगे यांचे आभार व्यक्त करतो. सध्या सदर काम पूर्णपणे थांबवले असून, जागा बदलण्यात येणार आहे.
– संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-चऱ्होली पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन.

मोशी आणि परिसरातील लोकवस्ती वाढली असून, कचरा संकलन केंद्रातून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला असता. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने कासारवाडी आणि गवळीमाथा येथे अशाप्रकारचे कचरा संकलन केंद्र प्रायोगिक तत्त्वावर उभारले आहे. त्या ठिकाणी लोकवस्ती नाही. त्यामुळे सिल्व्हर- ९ सोसायटीलगतचे प्रस्तावित केंद्र रद्द करण्याची सूचना प्रशासनाला केली होती. त्याला आयुक्त शेखर सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लोकआग्रहास्तव घेतलेल्या निर्णयाबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button