पिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात चोरीच्या पाच घटना : पाच लाखांचा ऐवज चोरीला

पिंपरी l प्रतिनिधी

चाकण, चिंचवड, एमआयडीसी भोसरी, चिखली पोलीस ठाण्यात चोरीचे पाच गुन्हे दाखल आहेत. त्यात तीन दुचाकी चोरीचे, एक टेम्पो चोरीचा तर एका गुन्ह्यात कंपनीतील माल चोरीला गेला आहे. याबाबत सोमवारी (दि. 7) चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दुचाकी चोरीचा पहिला गुन्हा चाकण पोलीस ठाण्यात दाखल आहे. शिवाजी राजाराम जाधव (वय 58, रा. राक्षेवाडी चाकण, ता.खेड) यांनी फिर्याद दिली आहे. जाधव यांची 50 हजारांची दुचाकी त्यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 7) दुपारी बारा वाजता घडली.

दुचाकी चोरीचा दुसरा गुन्हा एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यात अजय लक्ष्मण ढोकणे (वय 23, रा. तापकीरनगर, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. ढोकणे यांची 25 हजारांची दुचाकी तापकीरनगर येथील डायमंड बेकरी जवळून चोरीला गेली. हा प्रकार शनिवारी (दि. 5) रात्री दहा ते पावणे बारा वाजताच्या कालावधीत घडला.

दुचाकी चोरीचा तिसरा गुन्हा चिखली पोलीस ठाण्यात दाखल आहे. शंकर बाबा पालवे (वय 42, रा. त्रिवेणीनगर, तळवडे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 20 हजारांची दुचाकी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंग मधून चोरीला गेली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 7) सकाळी सात वाजता उघडकीस आला आहे.

चाकण पोलीस ठाण्यात टेम्पो चोरी बाबत योगेश भाऊसाहेब शिंदे (वय 24, रा. दत्तवाडी, निघोजे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा चार लाख रुपये किमतीचा टेम्पो निघोजे येथील महिंद्रा कंपनीच्या विरुद्ध बाजूला पार्क केला असता अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार रविवारी (दि. 6) रात्री सात ते दहा वाजताच्या कालावधीत घडला.

चिंचवड येथील टाटा मोटर्सच्या फौंड्री मधील न्यू शेडमधून दोघांनी 18 हजार रुपये किमतीचे लोखंडी रिजेक्टेड कास्टिंग्स चोरून नेले. ही घटना 28 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच ते 29 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत घडली. याप्रकरणी सागर गजेंद्र गडकर (वय 54, रा. कोथरूड पुणे) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोहर रामाप्पा सांगलीकर (वय 42, रा. रुपीनगर, तळवडे), गणेश सखाराम मुंढे (वय 32, रा. मोरेवस्ती, चिखली) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button