पिंपरी / चिंचवड

बीआरटी मार्गात दुचाकीचा अपघात : दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी l प्रतिनिधी

बीआरटी मार्गातून खाजगी वाहनांना प्रवेश बंदी एकाने त्याची दुचाकी बीआरटी मार्गातून नेली. तिथे लावलेल्या दोरीला अडकून दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 3 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता जुना पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी चौकाजवळ घडला.

रामजनम अभिमन्यू विश्वकर्मा (वय 32, रा. गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांत आप्पा करे (वय 37, रा. जुनी सांगवी) यांनी सोमवारी (दि. 7) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीआरटी मार्गातून खाजगी वाहनांना प्रवेश बंदी आहे. असे असताना देखील रामजनम विश्वकर्मा याने त्याची दुचाकी बीआरटी मार्गातून नेली. पिंपरी चौकाजवळ बीआरटी मार्गात लावलेल्या दोरीला अडकून त्याची दुचाकी पडली. यामध्ये रामजनम हा गंभीर जखमी झाला. तसेच त्याच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले. रामजनम याचा या अपघातात मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक निखिल डोळस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button