breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर पालिकेचे जावई आहेत का?, एम्पायर इस्टेटच्या रॅम्प निविदेत स्पर्धाच नाही

रॅम्प बांधणीस 15 कोटी 79 लाख 63 हजार खर्च अपेक्षित

पिंपरी |महाईन्यूज|

चिंचवड येथील एम्पायर इस्टेट उड्डाणपूलावरुन खाली उतरण्यास आणि वरती चढण्यास रॅम्प बांधण्यात येणार आहे. त्या कामाची महापालिका स्थापत्य विभागाने निविदा प्रक्रिया राबविली. परंतू, मे.व्ही.एम.मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांची एकच निविदा आली. त्या निविदा प्रक्रियेत स्पर्धाच झालेली नाही. तरीही त्याच ठेकेदारांना काम देण्यास आज (बुधवार) स्थायी समितीने मान्यता दिली. दरम्यान, मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर हे पालिकेचे जावई आहेत का? असा प्रश्न पिंपरी चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती विलास मडिगेरी होते. एम्पायर इस्टेट उड्डाणपूलास चिंचवड येथून खाली उतरणेस आणि चढणेस रॅम्प बांधण्यात येणार आहे. त्या कामाची निविदा स्थापत्य विभागाने 28 फेब्रुवारी 2018 प्रसिध्दी केली. सदरील निविदा प्रक्रियेत एकाच ठेकेदाराकडून निविदा प्राप्त झालेली आहे. त्यात प्राप्त मुळ दर 15 कोटी 80 लाख 55 हजार 546 रुपये एवढी होती. मात्र, मे.व्ही.एम.मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांना पत्र देवून दर कमी विचारणा करणेत आली. त्यानूसार 15 कोटी 48 लाख 50 हजार रुपये इतका सादर केला आहे.

राज्य शासनाच्या सन 2018-2019 च्या दरसूची आणि एसएसआर नूसार टेस्टींग चार्जेस, आर.सी.सी. डिझाईन चार्जेस, सिमेंट व स्टील फरक, रायली चार्जेससह या कामाची किंमत 16 कोटी 20 लाख 47 हजार 722 इतकी येत आहे. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. मे.व्ही.एम.मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांनी दिलेला दर 15 कोटी 79 लाख 63 हजार 039 हा असून तो निविदा स्विकृत योग्य दराशी तुलना करता 2.52 टक्के कमी आहे. सदरील कामासाठी ठेकेदार यांनी सादर केलेला 15 कोटी 79 लाख 63 हजार रुपये सर्व चार्जेस धरुन आहेत. त्यामुळे निविदेतील अटीप्रमाणे भाववाढ कलमानूसार मटेरियल निर्धारित केलेल्या बेसीक दरामध्ये कंत्राट कालावधीत झालेली वाढ आणि घट दरानूसार फरकाची रक्कम अदा व वसुल करणे बंधनकारक राहील. त्यामुळे ठेकेदारासोबत करारनामा करुन घेण्यास मान्यता देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button