breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

औरंगाबाद जिल्हा बँक निवडणुकीत विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडेंचा पराभव

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. बागडे हेच शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख नेते होते. मात्र त्यांचाच पराभव झाला. निवडणुकीत बागडे यांच्या पॅनलचा मात्र दणदणीत विजय झाला आहे.

वाचा :-महाराष्ट्रात सरकार स्थापन होत असताना मोठ्या नेत्यांचेही फोन टॅप केले; राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप

अपक्ष उमेदवार अभिषेक जैस्वाल यांनी बागडे यांचा पराभव केलाय. बागडे यांना एकूण 123 मतं मिळाली, तर जैस्वाल यांना 147 मतं पडली. त्यामुळे जैस्वाल यांनी 24 मतांनी बागडे यांचा पराभव केला आहे. बिगर शेती संस्थेच्या विभागातून बागडे यांचा पराभव झाला आहे. बागडे यांच्या पॅनेलचे 14 उमेदवार विजयी झाले.

या पॅनलचे बिनविरोध निवडून आलेले रोहयोमंत्री संदीपान भुमरे व प्रोसेसिंग मतदारसंघातून निवडून आलेले महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही बागडे यांच्या पराभवानंतर ‘गड आला, पण सिंह गेला’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.बिगर शेती मतदारसंघातून शेतकरी विकास पॅनलचे विद्यमान चेअरमन नितीन पाटील, आमदार सतीश चव्हाण व आमदार अंबादास दानवे हे निवडून आले. सतीश चव्हाण व अंबादास दानवे यांनी प्रथमच बँकेची निवडणूक लढविली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button