breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

ज्योती देवरेंचा दणका! निलेश लंकेंचा वाळू चोरी करणारा ट्रक पकडला

अहमदनगर |

काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात यामुळे खळबळ उडाली होती. ‘लोकप्रतिनिधी त्रास देतात, प्रशासनातील वरिष्ठही हतबल असतात. लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या झुंडी सतत धावून येतात. वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत मदतीऐवजी मारेकरी पोहोचवले,’ असे शल्य व्यक्त करीत नगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ११ मिनिटांच्या ऑडिओ क्लिपद्वारे आपली सुसाइड नोट जाहीर केली होती. परंतु आता ज्योती देवरे यांनी त्यांच्या दैनंदिन कार्यालयीन कामकाजास सुरुवात केली आहे.

आज ज्योती देवरे यांनी निघोज येथे अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेतले आहे. MH 42 8886 हा अवैधरित्या वाळू वाहतूक करत असलेला ट्रक त्यांनी ताब्यात घेतला असल्याची माहिती मिळत आहे. हे वाहन गणेश लंके यांच्या मालकीचे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आमदार निलेश लंके विरुद्ध ज्योती देवरे असा संघर्ष गेले महिनाभर सुरू आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात देवरे यांनी लंके यांचे नावसाधर्म्य असलेला ट्रक पकडल्याने तालुक्यात साहजिक चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान गणेश लंके हे निघोजचे रहिवासी आहेत. निलेश लंके हे हंगे येथे वास्तव्यास आहेत. लंके कुटुंबाचे मूळ हे निघोजमध्येच असल्याचे सांगण्यात येते. आमदार लंके यांचे कुटुंब दोन-तीन पिढ्यांपूर्वी हंगे येथे स्थलांतरीत झाल्या आहेत. मात्र आमदाराच्या दूरच्या तरी भावकीचा ट्रक पकडल्याचे समाधान देवरे समर्थकांना मिळाले असेल्याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत. परंतु २ दिवसांपूर्वीच देवरे यांनी तब्बल 5 कोटी 94 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्ध लोकायुक्त मुंबई यांच्याकडे भ्रष्टाचाराची तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती अँड. असीम सरोदे यांनी दिली आहे. त्यामुळे लंके यांच्या समर्थकांना ज्योती देवरेंच्या विरोधात नवे कोलीतच हातामध्ये मिळाले असल्याचे सध्या तरी पाहायला मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button