breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

नवनीत राणांच्या आरोपांवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई |

राज्यात एकीकडे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे खळबळ उडालेली असताना दुसरीकडे दिल्लीतही या प्रकरणावरुन वातावरण तापलं आहे. खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांच्यावर धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यावर अरविंद सावंत यांनी खुलासा करत आरोप फेटाळून लावला आहे. नवनीत राणा यांनी सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणार म्हटलं आहे. दरम्यान याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी नवनीत राणा यांनी अरविंद सावंत यांच्यावर केलेल्या आरोपांवर बोलताना म्हटलं की, “यांना काही गंभीर आरोप म्हणत नाहीत. त्या महिलेने माझ्यावर सुद्धा असेच आरोप केले होते”.

काय आहे प्रकरण –
राज्यातील राजकीय परिस्थितीवर बोलताना खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी धमकावल्याची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. या आरोपांवर खासदार सावंत यांनी भूमिका स्पष्ट केली. मात्र, आता नवनीत राणा यांनी गुन्हा दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. “आपण तक्रार दाखल करणार (शिवसेना नेते अरविंद सावंत यांच्याविरुद्ध) आहे,” असं नवनीत राणा यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.

नवनीत राणांची तक्रार काय?
खासदार राणा यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केलेली आहे. “महाराष्ट्रात सुरु असलेलं मनसुख हिरेन हत्या प्रकरण, सचिन वाझे प्रकरण, तसेच मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी लिहिलेल्या पत्रावरुन ठाकरे सरकारच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. ते प्रश्न मी संसदेत उपस्थित केले. एक महिला खासदार होण्याच्या नात्याने महाराष्ट्रातील बिघडत असलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत ठाकरे सरकारविरोधात संसदेत आवाज उठवला. त्यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेच्या लॉबीत मला धमकी दिली. ‘तू महाराष्ट्रात कशी फिरते मी पाहतो. तुलाही जेलमध्ये टाकू’, अशा शब्दात त्यांनी मला धमकावलं. यापूर्वी शिवसेनेच्या लेटरहेडवर, फोनवर माझ्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे,” असं राणा यांनी म्हटलेलं होतं.

वाचा- महाराष्ट्रात सरकार स्थापन होत असताना मोठ्या नेत्यांचेही फोन टॅप केले; राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button