ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

‘महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थी सहाय्यता कक्ष’ सुरू करा’; दीपक मोढवे-पाटील

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करा

पिंपरी : राज्यातील महाविद्यालयात विद्यार्थी सहाय्यता केंद्र सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. तसेच, ‘रॅगिंग’ सारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपाचे माजी शहर उपाध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.

याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवले असून, त्यामध्ये म्हटले आहे की, ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामध्ये एक सिनियर विद्यार्थी इतर ज्युनियर विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करत आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यासह राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये रॅगिंग सारखे प्रकार आजही घडत असल्याची शंका निर्माण होते. त्यामुळे नवीन विद्यार्थी सीनियर विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या रॅगिंगच्या भीतीपोटी प्रवेश घ्यायला तयार होत नाहीत. यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

हेही वाचा – ‘मुळशी पॅटर्नच्या रिमेकच्या नावाखाली सलमानने कचराच केला’; प्रवीण तरडेंची टीका

पुणेसह पिंपरी-चिंचवड शहरात देखील महाविद्यालयाबाहेर बसून काह जण टवाळखोरी करत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला पाहिजे. मात्र, ही एक दिवसाची जुजबी कारवाई करून याला आळा बसणार नाही. त्यासाठी कायमस्वरूपी तोडगा निघणे गरजेचे आहे. त्यासाठी महाविद्यालय स्तरावर ही कार्यवाही होणे अपेक्षित आहे. शहरात पोलीस प्रशासनाकडून भरारी पथकांची निर्मिती केलेली आहे. या पथकांमार्फत होणाऱ्या कारवाईला वेग देणे आवश्यक आहे. तरच हुल्लडबाजांवर आळा बसेल, अशी नागरिकांची भावना आहे, असेही दीपक मोढवे-पाटील म्हटले आहे.

विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयात उच्च शिक्षण घ्यायचे असल्यास मारहाण, रॅगिंगसारखे प्रकार घडू नयेत, यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात शासनाचे नियंत्रण असणारे विद्यार्थी सहाय्यता केंद्र सुरू करावे. जेणेकरून विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीचे गाऱ्हाणे तिथे मांडले जाईल आणि त्यातून विद्यार्थ्यांची मदत होईल. या बाबत लवकर निर्णय घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. यावर सकारात्मक निर्णय होईल, असे अपेक्षीत आहे.

दीपक मोढवे-पाटील, माजी शहर उपाध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button