पिंपरी / चिंचवड

चाकणमध्ये महिलेचा विनयभंग, आळंदीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी l प्रतिनिधी

चाकण येथे रंग लावण्याच्या बहाण्याने घरात घुसून महिलेसोबत अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. तर आळंदी येथे 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी शनिवारी (दि. 19) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

चाकण पोलीस ठाण्यात पिडीत महिलेने विनयभंगाची फिर्याद दिली. त्यानुसार, लालबाबू बिरेंदर राम (वय 22, रा. उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शुक्रवारी (दि. 18) धुलीवंदनाच्या दिवशी त्यांच्या मुलासोबत घरी होत्या. त्यावेळी आरोपी फिर्यादी यांना रंग लावण्याच्या बहाण्याने घरात आला. त्याने फिर्यादी यांच्यासोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. फिर्यादी यांनी आरडाओरडा केला असता आरोपी घरातून पळून गेला. त्यांनतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

आळंदी पोलीस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईने फिर्यादी दिली आहे. त्यानुसार कृष्णा तुकाराम सातपुते (वय 20, रा. वडगाव रोड, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या 16 वर्षीय मुलीसोबत जवळीक साधली. त्यानंतर मुलीच्या इच्छे विरोधात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button