breaking-newsपिंपरी / चिंचवड

भाजप संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांच्या बदनामी प्रकरणी राष्ट्रवादीच्या चौघांवर गुन्हा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांच्याविषयी सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सुहास उभे (फेसबुक अकाऊंटधारक, पूर्ण नाव व पत्ता माहित नाही), नीता ढमाले, संजय अवसरमल, सागर गायकवाड असे गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अमोल विनायक थोरात (वय ३६, रा. सेक्टर नंबर २७ अ, कॅम्प एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूलजवळ प्राधिकरण, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे.

सध्या लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई होत आहे. निगडी पोलिसांनीही १८ एप्रिल रोजी मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांवर कारवाई केली. त्याचे फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल झाले. कारवाई झालेल्या नागरिकांनी तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधले असल्याचे दिसत आहेत. त्यातील एक फोटो भाजपचे शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांचा असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुहास उभे यांनी थोरात यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर लिहून तो आपल्या फेसबूक अकाऊंटवर पोस्ट केला आहे. तसेच या पोस्टमध्ये अमोल थोरात यांचा मूळ फोटोही आहे. याप्रकरणी थोरात यांनी निगडी पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती.

पोलिसांनी या तक्रारीची शहानिशा करून सुहास उभे यांच्यासह नीता ढमाले, संजय अवसरमल, सागर गायकवाड तसेच इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. संजय अवसरमल यांच्या फेसबुक अकाऊंटवर ते राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी ब्लॉक कमिटी अध्यक्ष असल्याचा उल्लेख आहे. तसेच चिंचवडमधील निता ढामाले या राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्या म्हणून समजल्या जातात. पोलिस उपनिरीक्षक महेंद्र आहेर तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button