breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांनी घरी राहून स्वतः व कुटुंबाचे कोरोनापासून रक्षण करावे – माजी उपमहापौर शैलजा मोरे

  • शहरात कोरोना विषाणुचे थैमान
  • आरोग्य यंत्रणेवर पडतो ताण

पिंपरी / महाईन्यूज 

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहून राज्य सरकारने १५ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. दरम्यान शहरात कोरोनाने थैमान माजविले आहे. अतिगंभीर रुग्णांच्या नातेवाईकांचे लोकप्रतिनिधीना मदतीसाठी अनेक फोन येतात. त्यांना मदत करणे जिकरीचे झाले असताना, आरोग्य यंत्रणांवर येणारा ताण यामुळे सर्वांनाच न्याय देणे शक्य होत नाही. ही परिस्थिती दिसत असतानाही काही लोक रस्त्यावर येऊन जोखीम घेताना दिसत आहेत. कोरोनाचा वाढता धोका पाहून शहरवासियांनी घरीच राहून स्वतः व कुटुंबाचे कोरोनापासून रक्षण करावे, असे आवाहन माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजा मोरे यांनी केले आहे.

कोरोनाची बाधा झालेले नागरिक बेड, व्हेंटिलेटरसाठी दरदर भटकत आहेत. कोणाला बेड न मिळाल्यामुळे रुग्णालयाबाहेर जीव सोडावा लागतो आहे तर, कुणी रुग्णालयाच्या गेटवर १०-१० तास उपचारासाठी प्रतीक्षेत उभे आहेत. रेमेडिसिविर मिळतील का? प्लीज १ बेड बघा ना, जंबोला व्हेंटिलेटरवर आमचा माणूस पाठवायचा आहे, तेवढ डॉक्टर लोकांशी बोला ना? असे दिवसाला किमान १०० फोन येत आहेत. कुणी माझे मार्गदर्शक तर कुणी माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत काम करणारे सहकारी. सगळी माझ्या हक्काची माणसं.

प्रशासनाच्या मदतीने त्यांच्यासाठी १०० टक्के प्रयत्न सुरु आहेत. परंतु, पालिकेच्या रुग्णालयांबरोबरच शहरातील खासगी रुग्णालयांवर प्रचंड ताण आहे. शहराची आरोग्य यंत्रणा कोरोनारूपी राक्षसाचा बिमोड करण्यात व्यस्त आहे. Oxygen बेड, व्हेंटिलेटर नाही, रेमेडिसीवीर इंजेक्शन आदींची कमतरता भासत आहे. उपचाराअभावी अनेकांचा जीव जातोय. दररोज तीन हजार बाधित रुग्ण आढळत असून ६० ते ७० जणांचा बळी जातोय. मनापासून मदत करायची इच्छा असतानाही नाईलाजाने Oxygen बेड, इंजेक्शन उपलब्ध नाही, असं उत्तर द्याव लागतंय. आम्ही लोकप्रतिनिधीसुद्धा प्रचंड हतबल झालो आहोत. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर विनाकारण भटकंती करू नये. स्वतःची काळजी घ्यावी, आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे व सुरक्षित रहावे, हेही दिवस निघून जातील, असे आवाहन शैलजा मोरे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button