breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज मतदान, महाराष्ट्राच्या ८ जागांवर मतदानाला सुरूवात

पुणे | दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरूवात झाली आहे. १२ राज्यांमधील ८९ लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान. महाराष्ट्रातील ८ मतदारसंघांमध्ये आज मतदान होणार आहे. प्रकाश आंबेडकर, नवनीत राणा, प्रतापराव चिखलीकर, संजय जाधव आदी उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. विदर्भातील ६ आणि मराठवाड्यातील २ जागांवर मतदान होत आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, आणि परभणी या महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती पक्षात तिरंगी लढत होत आहे. नवनीत राणा भाजपच्या उमेदवार आहेत. काँग्रेसतर्फे बळवंत वानखेडे तर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीचे दिनेश बुब रिंगणात आहेत.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव, शिवसेना ठाकरे गटातर्फे नरेंद्र खेडेकर तर शेतकरी नेते रविकांत तुपकर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजप विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. भाजपतर्फे रामदास तडस तर महाविकास आघाडीतर्फे अमर काळे रिंगणात आहेत.

हेही वाचा     –      मतदान कार्ड नसले तरी देखील मतदान करता येणार!

यवतमाळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विरूद्ध शिवसेना ठाकरे गटात होणार आहे. महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे (ठाकरे गट) संजय देशमुख तर महायुतीतर्फे शिवसेनेच्या (शिंदे गट) जयश्री हेमंत पाटील रिंगणात आहेत.

अकोला लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे अभय पाटील यांच्यात लढत होत आहे.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विरूद्ध शिवसेना ठाकरे गटात प्रमुख लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीकडून बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने नागेश आष्टीकर यांना मैदानात उतरवले आहे. तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. बी. डी. चव्हाण रिंगणात आहेत.

नांदोड लोकसभा मतदारसंघात भाजप विरूद्ध काँग्रेसमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यात लढत होणार आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव आणि महायुतीच्या वतीने रिंगणात असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यात लढत होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button