breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कॅशलेस सेवा होईना सुरळीत ,पीएमपीने चार हजार प्रवाशांचे पैसे केले परत

पिंपरी : पीएमपीने तिकीट विक्रीसाठी अमलात आणलेली कॅशलेस सेवा अद्याप सुरळीत झाली नसल्‍याचे दिसून येत आहे. अनेकदा प्रवाशांचे पैसे कट होऊनही तिकीट मिळत नव्‍हते. अशा प्रवाशांना आपले पैसे परत मिळविण्यासाठी अतिशय किचकट प्रकि्रया पूर्ण करावी लागते. ही क्लिष्ट प्रकि्रया सहा हजारांहून अधिक प्रवाशांनी पूर्ण केली. त्‍यापैकी चार हजार प्रवाशांचे सुमारे दीड लाख रुपये पीएमपीने परत केले आहेत.

पीएमपीने सुट्ट्या पैशांची कटकट मिटावी म्हणून सुरू केलेल्या ऑनलाइन तिकीटांच्या पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून दिला. मार्च अखेर २१ लाखांहून अधिक व्यवहार नोंदविले गेले आहेत. मात्र, रेंज नसणे आणि इतर कारणांनी पैस वजा होऊनही तिकीट मिळत नव्हते. त्यामुळे प्रवाशांना रोख रक्कम भरावी लागत होती.

अशा तिकीटाचे पैसे वजा झालेल्या ४ हजार २०४ जणांचे सुमारे दीड लाख रुपये पीएमपीच्या विकीट विभागाकडून परत करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड, पुणे आणि पीएमआरडीएच्या क्षेत्रात पीएमपी आपली सेवा देते. तर, सुमारे ११ लाख प्रवासी पीएमपीच्या बसने रोज या क्षेत्रात प्रवास करतात.

हेही वाचा – मतदान कार्ड नसले तरी देखील मतदान करता येणार!

नियमित प्रवास करणाऱया प्रवाशांचा सुट्ट्या पैशांवरून रोजच वाद होत होते. ते टाळण्यासाठी ऑक्टोबर २०२३ पासून ऑनलाइन माध्यमातून पीएमपी प्रशासनाने प्रवाशांसाठी युपीआय तिकीट पद्धती सुरू केली. तर, येत्या १ मे पासून पीएमपी गो ॲप कार्यरत होणार असून या माध्यमातून आता प्रवाशांना घरबसल्या आॅनलाइनच्या माध्यमातून तिकीट काढता येणार आहे.

युपीआय तिकीट पद्धतीमध्ये विविध कारणांनी तिकीट निघत नसल्याने प्रवाशांना पैसे कट होऊनही रोख रक्कम देऊन पुन्हा तिकीट काढावे लागत होते. त्यामुळे अनेकदा वाहक व प्रवासी यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उद्‍भवत होते. आॅक्टोबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत यूपीआय पेमेंटद्वारे पैसे भरूनही तिकीट न मिळाल्याने आतापर्यंत सुमारे ६ हजार ११८ जणांनी तक्रार अर्ज दाखल केलेले आहेत.

तर, २ लाख ४० हजार रुपये इतकी रक्कम आहे. त्यातील सुमारे ४ हजार २०४ जणांचे पैसे पीएमपीच्या तिकीट विभागाकडून परत करण्यात आले आहेत. सर्व पैसे हे अर्ज मागवून बँकेमार्फत परत करण्यात आलेले आहेत.

आजच्‍या डिजिटल युगात बहुतेक पेमेंट ऑनलाइन केले जातात. परंतु पीएमपीच्‍या बाबतीत परिस्‍िथती उलट आहे. पीएमपी बसने रोज सरासरी ११ लाख प्रवासी प्रवास करतात. याचा अर्थ की आॅक्टोबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत पीएमपीने सुमारे १८ कोटी तिकीटे दिली. त्‍यापैकी केवळ २१ लाख आॅनलाइन आहेत. त्‍यातही प्रचंड तक्रारी आहेत.

जर संपूर्ण तिकीट व्यवस्‍था कॅशलेस केल्‍यास किती अडचणी आणि तकारी येतील? तिकीटासाठी आॅनलाइन ट्रान्‍सफर केलेले २० ते ३० रुपये परत मिळविण्यासाठी पीएमपीने क्लिष्ट प्रकि्रया ठेवली आहे, यामुळे अनेक जण तक्रारीच करत नाहीत. लोकांनी तक्रारीच करु नये, यासाठी अशी प्रकि्रया ठेवल्‍याचा आरोप प्रवासी करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button