breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लष्कर हद्दीतील रस्ते भूखंड हस्तांतरणसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मध्यस्ती; महापौर, सभापतींचा आग्रह

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मध्यस्ती करणार
  • दिल्लीत बैठक होऊन मार्ग काढण्याचे दिले आश्वासन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील मौजे पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, सांगवी, पिंपळे गुरव, दिघी, बोपखेल या गावाच्या आजू-बाजूला सरंक्षण विभागाच्या मिळकती आहेत. महापालिकेच्या मंजुर विकास योजनेत सरंक्षण विभागाच्या हद्दीतून रस्ते दाखविण्यात आलेले आहे. शहरातील वाढती लोकसंख्या व वाहतुकीचा विचार करता हे रस्ते विकसीत होणे गरजेचे आहे. रस्त्यासाठी आवश्यक असणारी जागा सरंक्षण विभागाने महापालिकेकडे हस्तातंरीत करण्याची मागणी महापौर उषा ढोरे आणि स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

सडक परिवहन मंत्री नितिन गडकरी हे पुणे भेटीस (दि. ६) आले होते. पुणे विमानतळावर त्यांची भेट घेऊन महापालिकेला आवश्यक असणा-या सरंक्षण विभागाकडील आवश्यक जागा संरक्षण विभागाकडून पालिकेकडे हस्तांतरीत करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

खालील जागांचा समावेश

१) कासारवाडी लांडेवाडी भोसरी येथील उच्चक्षमता द्रुतगती मार्गातील सीएमई कॉलेज हद्दीतील जागा

२) मौजे पिंपळे सौदागर सर्व्हे नं. २८ व २९ (HCMTR) मधील जाणारा उच्चक्षमता द्रुतगती मार्ग

३) मौजे पिंपळे सौदागर येथील सर्व्हे नं.७९ ते ११९, १२० व १२१ पैकी जागेतुन जाणारा १८ मी रुंद रस्ता  

४) मौजे पिंपळे निलख येथील सर्व्हे नं. ९,१२ व १३ मधील १२ मीटर रुंद रस्ता

५) सांगवी फाटा ते सांगवी गाव १२ मीटर रस्ता

६) मौजे बोपखेल येथील आळंदी रोड ते गणेशनगर सर्व्हे नं. ३१, ३४, ३५, २८, ४९, ५१ व १२७

७) सांगवी येथील १२ मीटर रस्ता

८) पिंपरी येथील मिलिट्री डेअरी फार्म जवळ रेल्वे उड्डामपूलासाठीची जागा

९) पिंपळे गुरव ते मौजे सांगवी पर्यंत संरक्षण विभागाच्या हद्दीतील १२ मीटर रुंद रस्त्यालगत आणखी १८ मीटर रुंद रस्ता

१०) भोसरी कासारवाडी येथील सर्व्हे नं. ५१८, ५१९, ५२० या मिळकतीमधून जाणारे रस्ते  

वरील जागांबाबत सविस्तर माहितीचे निवेदन देऊन सरंक्षण विभागाकडील जागा महापालिकेकडे हस्तांतरीत करणेकामी संरक्षण विभागाची बैठक आयोजीत करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. यावेळी महापालिकेकडून महापौर उषा उर्फ माई ढोरे, सभापती, स्थायी समिती विलास मडिगेरी, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, माधवी राजापुरे, माजी नगरसेवक राजु दुर्गे तसेच आमदार माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.                                  

या भेटीच्यावेळी नितिन गडकरी यांनी सरंक्षण विभागाच्या मागणीनुसार रस्त्यांसाठी आवश्यक असणा-या जागेची रक्कम सरंक्षण विभागास अदा करावी लागेल. तसेच, सरंक्षण विभागाच्या हद्दीतून जाणारे रस्ते विकसीत करणेसाठी जे जे बांधकाम पाडले जाईल ते बांधकाम महापालिकेने बांधून द्यावे लागेल असे सांगितले आहे.

सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचेसोबत या प्रश्नाबाबत बैठक आयोजीत करणेकामी आपण प्रमुख भुमिका घेऊन मार्गदर्शन व मदत करणेकामी त्यांना विनंती केली आहे. रस्त्यासाठी आवश्यक असणा-या जागेच्या माहितीची देवाण, घेवाण करणेकामी दिल्ली येथे येण्यास सांगितले आहे. याबाबत या महिन्या अखेरीस सरंक्षण विभागाकडे  बैठक आयोजीत करणेत येईल. त्यावेळी आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे, महापालिकेचे पदाधिकारी, महापालिका आयुक्त व अधिकारी हे उपस्थित राहणार आहेत. सरंक्षण विभागाशी समन्वय साधून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गस्थ करणेकामी सहकार्य केले जाईल, असे गडकरी यांनी आश्वासन दिल्याचे सभापती मडिगेरी यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button