ताज्या घडामोडीपुणे

पुणे मेट्रो मार्गावरील भोसरी व बुधवार पेठ दोन्ही स्थानकांच्या नावामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ: स्थानकांची नावे बदलण्याची मागणी

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी लोकार्पण करण्यात आलेल्या पुणे मेट्रो मार्गावरील भोसरी आणि बुधवार पेठ या दोन स्थानकांची नावे बदलण्याची मागणी समोर आली आहे. या दोन्ही स्थानकांच्या नावामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण होत असल्याचे दिसत आहे.

पुणे मेट्रो मार्गावर भोसरी नावाचे स्थानक आहे. वास्तविक भोसरी नावाचे ठिकाण हे पिंपरी चिंचवड पालिका हद्दीत येते.परंतु जेव्हा सामान्य प्रवासी पुणे मेट्रोतून प्रवास करतात तेव्हा ते भोसरी स्थानकावर उतरल्यानंतर गोंधळात पडत आहेत. कारण हे स्थानक मुंबई-पुणे महामार्गाजवळील नाशिक फाट्याजवळ आहे. प्रवाशी हे पिंपरी चिंचवड येथील भोसरी स्थानक समजून तिकीट काढतात आणि भलत्याच ठिकाणी येऊन उतरतात. भोसरीची जागा ही नाशिक फाट्यापासून तब्बल ५ किमी दूर आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, भोसरी स्थानकाच्या नावामुळे त्यांना नाहक त्रास होऊ लागला आहे. केवळ या भोसरी या नावामुळे प्रवाशांचा वेळ, पैसा आणि मेहनत वाया जात आहे. तसेच याच पुणे मेट्रो मार्गावरील बुधवार पेठ स्थानकाच्या नावाबाबतही स्थानिक नागरिकांनकडून तक्रारी केल्या जात आहेत. कारण बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय चालतो, त्यामुळे या स्थानकाचे नाव बदलून कसबा पेठ करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, या दोन्ही स्थानकांची नावे बदलण्याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर आता मेट्रो रेल्वे प्रशासनानेही ही नावे बदलण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून संबधित विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button