पिंपरी / चिंचवड

मोबाईलवर लिंक पाठवून 25 हजारांची फसवणूक

पिंपरी l प्रतिनिधी

मोबाईलवर लिंक पाठवून त्याआधारे बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन 25 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार चिखली येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कैलास भिकाजी गवळी (वय 45, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पंजाब नॅशनल बॅंक खाते क्रमांक 0606010230216 धारक आणि 07384806563 मोबाईल धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा लहान मुलगा मोबाईलवर गेम खेळत असताना अनोळखी व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली. मुलाला त्यावर रजिस्ट्रेशन करण्यास सांगून मुलाकडून आरोपीने ओटीपी नंबर मिळवला. त्यानंतर फिर्यादी यांच्या बँक खात्यातून 25 हजार रुपये नेट बँकिंगद्वारे काढून घेत फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button