टेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडीमनोरंजन

कन्नड चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री रान्या रावला सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक

वडील कर्नाटकचे डीजी, 15 किलो सोन्याची तस्करीत

कर्नाटक : कन्नड चित्रपटांमध्ये काम केलेली प्रसिद्ध अभिनेत्री रान्या रावला सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दुबईहून सोने घेऊन ती बंगळुरू विमानतळावर उतरली होती. डीआर अधिकाऱ्यांना संशय आल्यामुळे तिला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तिची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान तिच्याकडे सापडलेले १४.८ किलो सोने जप्त करण्यात आले. रान्या ही कर्नाटकचे डीजी रामचंद्र राव यांची मुलगी असून वडिलांच्या प्रभावाचा फायदा घेऊन ती तस्करी करत होती असे म्हटले जात आहे.

सध्या डीआरआयच्या पथकाने रान्याला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रान्या ही पोलीस महासंचालक रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. रान्याच्या आईने रामचंद्र राव यांच्याशी दुसरे लग्न केले आहे. डीआरआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रान्याने यापूर्वी कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि तिच्या बहुचर्चित चित्रपटांपैकी एक होता ‘माणिक्य.’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले होते. आता रान्याला तस्करी करताना अटक झाली आहे.

हेही वाचा –  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार ? उद्याच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष

दुबईहून आणले सोने

रान्या गेल्या बऱ्याच दिवसांपासून दुबईहून भारतात सोन्याची तस्करी करत होती. दरम्यान, डीआरआय अधिकाऱ्यांना रान्याबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर डीआरआयचे अधिकारी विमानाच्या आगमनाच्या दोन तास आधी विमानतळावर पोहोचले आणि दुबईहून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची चाचणी करु लागले. पोलीस अधिकाऱ्यांनी रान्याची तपासणी सुरु करताच तिने सर्वप्रथम वडिलांचे नाव सांगत प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला.

१२ कोटी रुपयांचे सोने जप्त

रान्या राव ही डीजींची मुलगी असताना देखील पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचा तपास सुरु ठेवला. अधिकाऱ्यांनी रान्याचे कपडे तपासण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान, तिच्या कपड्याच्या आतील भागात 14.8 किलो सोन्याचा थर असल्याचे समोर आले.डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री रान्या रावकडून जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत जवळपास १२ कोटी रुपयांहून अधिक आहे. आता डीआरआयने या रॅकेटशी संबंधित इतर लोकांचा शोध सुरू केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button