EVMऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका? धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचं निवडणूक आयोगाला पत्र

धाराशिव | मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. अर्ज जर जास्त आले तर EVMऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची कसरत करावी लागणार आहे. मतपत्रिका व मतपेट्याचा वापर करणे पण जिकरीचे काम करणार आहे. याप्रकरणात जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.
धाराशिव जिल्ह्यात ७३६ गावे आहेत. बार्शी व औसा या तालुक्यातील जवळपास १५० पेक्षा जास्त गावे आहेत. ३८४ पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर, मतपत्रिकावर निवडणुक घ्यावी लागते. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. जास्त उमेदवारी अर्ज आल्यास EVMऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी लागणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
हेही वाचा – शिवसेना-भाजपत वादाची ठिणगी? रामदास कदम यांचा भाजप नेत्यांना गंभीर इशारा
जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाला याविषयीचे पत्र लिहिले आहे. मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी लागेल ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांच्याकडे मार्गदर्शन मागितले आहे.





