breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

‘पिंपरी-चिंचवडकर’ म्हणून आमदार लांडगे यांना मंत्रीपद मिळाल्यास आनंदच : शंकर जगताप

चिंचवड विधानसभा मतदार संघात ‘मोदी@9 महा-जनसंपर्क अभियान’ : आमदार अश्विनी जगताप आणि सहकाऱ्यांकडून जोरदार तयारी

पिंपरी : शहराचे लोकनेते प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यानंतर पिंपरी-चिंचवडला आतापर्यंत मंत्रीपद मिळाले नाही. आता भाजपा शहराध्यक्ष आणि भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपद मिळाले, तर आनंदच आहेच, शहरवासीयांचीही इच्छा आहे, असे मत भाजपाचे प्रदेश विशेष निमंत्रीत सदस्य तथा माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता पार्टीतर्फे चिंचवड विधानसभा मतदार संघांतर्गत ‘‘मोदी@9महा-जनसंपर्क अभियान’’ राबविण्यात येत आहे. या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत जगताप बोलत होते. यावेळी चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर माई ढोरे, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळुराम बारणे, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, महिला मोर्चा शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शंकर जगताप म्हणाले की, पिंपरी-चिंचवडकर म्हणून प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यानंतर शहराला मंत्रीपद मिळालेले नाही. आता आमदार लांडगे यांना मंत्रीपदी संधी मिळेल, अशी चर्चा आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी सर्वांनाच आनंद होईल.

‘बदल’ हा असायलाच हवा…

पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्षपदी आमदार महेश लांडगे यांचा कार्यकाळ संपलेला आहे. त्यांच्यावर शिरुर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी पक्षाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर शहराध्यक्षपदी चिंचवडला संधी मिळावी, याबाबत विचारले असता आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या की, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य आहे. ‘बदल’ हा असायलाच हवा, असा दावाही आमदार जगताप यांनी केला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्षपदी नवा चेहरा कोण? याकडे भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button