breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

संजोग वाघेरेंनी घेतले अजित पवारांचे आशीर्वाद, खासदार बारणेंचं टेन्शन वाढलं?

पिंपरी | मावळ लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील कधीकाळी अजित पवार यांचे कट्टर समर्थक होते. राष्ट्रवादीच्या बंडानंतर ते अजित पवार यांच्यासोबत राहिले. परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांना मावळमधून उमेदवारी महाविकास आघाडीने दिली. आता त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतल्याने मावळ लोकसभा मतदारसंघात वेगळीच चर्चा रंगली आहे.

पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलीच्या विवाह प्रसंगी शुक्रवारी संध्याकाळी गाठी- भेटीचा कार्यक्रम होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेते ही कार्यक्रमाला हजर होते. यानिमित्ताने महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर आले. संजोग वाघेरे यांनी अजित पवारांना वाकून नमस्कार करून आशीर्वाद घेतले. यामुळे मावळ लोकसभेत वेगळीच चर्चा रंगली आहे.

हेही वाचा    –      ‘कोल्हेंनी फक्त नावाला गावे दत्तक घेतली, त्या गावांना सोयीसुविधा मी पुरवतोय’; आढळराव पाटलांची टीका 

दरम्यान, श्रीरंग बारणे यांनी २०१९ ला झालेल्या निवडणुकीत पार्थ पवार यांचा दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता. हाच पराभव अजित पवारांसह पार्थ पवारांच्या जिव्हारी लागला होता. संजोग वाघेरे यांनी लग्नाच्या व्यासपीठावर अजित पवारांचा आशीर्वाद घेतल्याने संजोग वाघेरे यांना छुपा पाठिंबा नाही ना? अशी शहरात चर्चा रंगली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button