breaking-newsपुणे

येरवडा कारागृह प्रशासनाने घेतल्या खबरदारीच्या उपाययोजना

पुणे |महाईन्यूज|

पुणे शहरात करोनाचे तब्बल 16 रुग्ण आढळल्यानंतर येरवडा कारागृह प्रशासनानेदेखील खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. इराणमध्ये कैद्यांनी करोनाच्या भीतीने उठाण करून जेल तोडून पलायन केले होते. तर नंतर सरकारने काही कैद्यांची मुक्‍तताही केली. भारतातही तिहार जेलमध्येही कैद्यांनी करोनाची भीती व्यक्‍त केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्वच कारागृहांत दक्षता घेण्यात येत आहे.

येरवडा कारागृहाने मास्कचे स्वत: उत्पादन घेतले आहे. ते कर्मचाऱ्यांना व सुरक्षा रक्षकांना वाटण्यात आले. तसेच कैद्यांनाही मागणी प्रकारे दिले आहेत. तर न्यायालयातून येणाऱ्या कैदी आणि कर्मचाऱ्यांना दारातच हात धुण्यासाठी सॅनिटायजरची सोय केली आहे.

येरवडा कारागृहात जवळपास 5800 कैदी शिक्षा भोगत आहेत, त्यापैकी 3 हजार अंडरट्रायल आहेत. त्यांना तारखेप्रमाणे न्यायालयात हजर करावे लागते. यामुळे न्यायालयाच्या आवारात त्यांचा इतरांशी संपर्क येत असतो. दरम्यान, शहरात सॅनिटायझर आणि मास्कचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्‍वभूमीवर इतके मास्क बाजारपेठेत स्वस्त मिळणे अशक्‍य होते. या पार्श्‍वभूमीवर येरवडा कारागृहाने मागील आठवडाभरात स्वत: 2 हजार मास्कचे उत्पादन घेतले आहे.

करोना विषाणूचा संसर्ग राज्यभर वाढत असल्याने कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी खबरदारी घेण्याच्या आणि सॅनिटायझर व मास्कचा पुरेसा वापर करण्याच्या सूचना कारागृहांना दिल्या आहेत. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने जारी केलेले मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रकही कारागृहांना पाठवले आहे. त्यांनी राज्यातील पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, नगर, विसापूर आणि आटपाडी खुल्या वसाहत कारागृह अधिक्षकांना करोना संदर्भात दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शकतत्वानुसार न्यायालयात खबरदारी घेण्यात येत आहे. न्यायालयात सॅनिटायजर आणि मास्कची उपलब्धता करून देण्यात आली आहे. आरोग्याच्या दुष्टीने योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
– यू. टी. पवार, कारागृह अधिक्षक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button