breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य नागरिकांचा विकास : आमदार अश्विनी जगताप

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील एक लाख कुटुंबांपर्यंत पोहचण्याचा संकल्प : महापालिकेत पुन्हा भाजपाची सत्ता, शहर भाजपा पदाधिकारी यांचा निर्धार

पिंपरी:  पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील नऊ वर्षात सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून विकास प्रकल्प राबविण्यात आले. या विकास प्रकल्पांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष लाभ देशभरातील सर्वस्तरातील महिला, कष्टकरी कामगार यांना झाला आहे. या विविध विकास प्रकल्पांची माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली देशात आणि राज्यात “मोदी@9 महा-जनसंपर्क अभियान’’ राबविण्यात येत आहे.  त्या अंतर्गत चिंचवड विधानसभा तसेच मावळ लोकसभा मतदार संघात हे अभियान राबविण्यात आले. यानिमित्ताने पत्रकार परिषदेत माहिती देताना आमदार जगताप बोलत होत्या.

यावेळी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, भाजपा प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य शंकर जगताप,         “मोदी@9” चे चिंचवड विधानसभा संयोजक व जिल्हा सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, “मोदी@9” प्रदेश सदस्य संतोष कलाटे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष संकेत चोंधे, महिला मोर्चा शहर अध्यक्षा उज्ज्वला गावडे, “मोदी@9” अंतर्गत अभियानांचे  संयोजक शत्रुघ्न काटे, माजी नगरसेवक संदीप कस्पटे, राजेंद्र चिंचवडे, शारदा सोनवणे, बाळासाहेब ओव्हाळ, सागर आंघोळकर, माजी प्रभाग स्विकृत सदस्य संदीप गाडे, भाजपा सांगवी काळेवाडी मंडल अध्यक्ष विनोद तापकीर, चिंचवड किवळे मंडल अध्यक्ष योगेश चिंचवडे आदी प्रमुख उपस्थित होते.

आश्विनी जगताप म्हणाल्या की, भारतीय जनता पार्टीचे नेते आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या कार्यकलाला नऊ वर्ष पूर्ण झालेले आहेत. या नऊ वर्षांमध्ये मोदी सरकारने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. सर्व सामान्य नागरिकांना लाभदायक ठरतील आशा अनेक चांगल्या योजना त्यांनी देशवासीयांकरिता आणल्या आणि त्या प्रभावीपणे राबविल्या आहेत ही सर्व विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत याकरता भारतीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.  नड्डा यांच्या नेतृत्वात देशातील सर्व लोकसभा व विधानसभा क्षेत्रांमध्ये महा जनसंपर्क अभियान व विविध कार्यक्रम म्हणजेच “मोदी@9” राबविण्यात येत आहेत. 

महापालिकेत पुन्हा भाजपाची सत्ता येणार : जगताप

भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरोघरी संपर्क साधला असून, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील एक लाख कुटुंबांपर्यंत पोहचण्याचा भाजपाचा संकल्प आहे. आगामी काळात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. आता पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवड मनपावर भाजपची सत्ता येणार असल्याचा विश्वास आमदार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केला. 

“मोदी@9” चे विविध कार्यक्रम पुढीलप्रमाणे : 

चिंचवड विधानसभा क्षेत्रामध्ये “मोदी@9” अंतर्गत अनेक कार्यक्रम राबविले गेले. सोशल मीडियावरती प्रभाव असलेल्या व्यक्ती म्हणजेच सोशल मीडिया इंफ्ल्युंसर यांचे संमेलन चिंचवड विधानसभा क्षेत्रातील गोविंद गार्डन हॉलमध्ये घेण्यात आले. या संमेलनाला चिंचवड विधानसभा क्षेत्रातले ज्यांना हजारो फॉलोवर्स आहेत अशा सोशल मीडिया इंफ्ल्युंसरना बोलविण्यात आले होते व त्यांचे अनुभव देखील सर्व उपस्थितानी  ऐकले. केंद्र आणि  राज्य सरकारच्या विविध योजनांचे  लाभार्थी यांचे एक मोठे संमेलन चिंचवड विधानसभेत  घेण्यात आले. या संमेलनाला माजी राज्यमंत्री व मावळ लोकसभा “मोदी@9” संयोजक  बाळासाहेब भेगडे यांसह चिंचवड विधानसभेतील सर्व प्रमुख  उपस्थित होते. दि. २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चिंचवड विधानसभा क्षेत्रामध्ये सर्व नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी यांच्या माद्यमातून 15 पेक्षा मोठे कार्यक्रम योग दिनानिमित्त झाले. सर्व कार्यक्रम हे विधानसभा स्तरावर झाले उद्या चिंचवड विधानसभा क्षेत्रातील सर्व सन्माननीय नगरसेवक सर्व शक्ती केंद्रप्रमुख सर्व चिंचवड विधानसभा क्षेत्रात येणारे जिल्हा पदाधिकारी मंडल पदाधिकारी यांची एकत्रित एक टिफिन पार्टी कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर घरोघरी संपर्क अभियान याकरिता भारतीय जनता पार्टी चिंचवड विधानसभेच्या वतीने घरोघर संपर्क अभियान पक्षाचे सर्व नगरसेवक सर्व शक्ती केंद्रप्रमुख व पदाधिकारी यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे या अभियानात विधानसभेतील एक लाख कुटुंबांपर्यंत संपर्क करून  केंद्र सरकारची  कामगिरी असलेले एक पत्रक पोहचवण्यात येणार आहे यानिमित्ताने चिंचवडमधील सर्व कुटुंबांचा एक व्यापक संपर्क देखील  होणार आहे. मावळ लोकसभेतील  पक्षाच्या सर्व मोर्च्या व आघाडी यांच्या पदाधिकाऱ्यांचे एकत्रित  संयुक्त मोर्चा संमेलन तळेगाव दाभाडे येथे  झाले. लोकसभेतील व्यापाऱ्यांचे संमेलन लोणावळा येथे झाले. मावळ लोकसभा मतदारसंघात भेगडे लॉन्स येथे केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेबजी दानवे व आमदार माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार उमा खापरे, आदीसह मावळ लोकसभेतील सर्व लोकप्रतिनिधी व जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भव्य सभेचे आयोजन  करण्यात आले होते. मावळ लोकसभेतील पिंपरी आणि चिंचवड या दोन विधानसभा क्षेत्रांमध्ये जनसंघापासून काम करणारे ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे संमेलन राज्याचे महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत पार पडले. मावळ लोकसभेतील बुद्धिवंत नागरिकांचे संमेलन वडगाव मावळ येथे  संपन्न झाले. या संमेलनाला राज्याचे भारतीय पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button