breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

बहुगुणी ‘ताक’…

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढण्यासाठी किंवा अशक्तपणा दूर करण्यासाठी ताक पिण हे शरिरासाठी उत्तम असते. कोल्डड्रिंक किंवा अन्य शीतपेय पिण्यापेक्षा ताक हा चांगला पर्याय आहेत. फक्त उन्हाळ्यातच ताक प्याव असेही काही नाही..कारण पावसाळा आणि हिवाळय़ामध्ये आपल्याला भूक जास्त लागते मात्र पाणी पिण्याचे प्रमाण आपसूकचं कमी होत. अशा वेळी दिवसातून एकदा किंवा दोन ते तीन दिवसांतून एकदा ताक पिणे उपयुक्त ठरू शकत. ताक हे जास्तच थंड न पिता कमी तापमानात प्यायले तरी चालते. त्यामुळे सर्दी होण्याची शक्यता कमी होते. तर, ताक पिण्याचे भरपूर फायदे आहेत. ते फायदे कोणते आहेत ते जाणून घेऊयात.

१. दुग्धजन्य पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे ताक. शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आणि अनेक गुणधर्म ताकात आहेत. दह्यामध्ये पाणी मिक्स करुन ते घुसळलं की ताक तयार होतं. ताक प्यायल्यामुळे सतत लागणारी तहान शमते.

२. ताक प्यायल्यामुळे पोट पटकन भरतं.

३. ताकामुळे शरीराला थंडावा मिळतो. त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जुन ताक प्यावं.

४. ताकामुळे वजन नियंत्रणात राहतं.

५. ताकामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं.

६. पचनक्रिया सुरळीत राहते.

७. अन्नपचन नीट होतं.

८. अपचन, पित्ताचा त्रास, गॅसेस यांचा त्रास कमी होतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button