breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

उन्हाळ्यात भाज्या होतात लवकर खराब ? या टिप्स फॉलो करा अन् भाज्या ठेवा ताज्या

Vegetables Fresh For Longer Time : उन्हाळा सुरू होताच तापमान वाढतं, उन्हाचा कडाका वाढू लागतो. आणि त्यामुळे भाज्या लवकर खराब होऊ लागतात. पण काही सोप्या उपायांनी आपणया भाज्या जास्त काळ ताज्या ठेवू शकतो. कसं, ते जाणून घेऊया.उन्हाळ्यात अनेकदा भाज्या लवकर खराब होतात. अशा परिस्थितीत ताज्या, रसरशीत भाज्या क्वचितच खायला मिळतात. पण अगदी काही सोप्या टिप्स आहेत ज्याद्वारे आपण आपल्या घरातील भाजी जास्त काळ ताजी ठेवू शकतो. कसं, ते जाणून घेऊया.

भाज्या कोरड्या ठेवा : बाजारातून भाज्या आणल्यानंतर साध्या पाण्याने त्या स्वच्छ धुवा. धुतल्यानंतर, त्या पूर्णपणे एखाद्या कापडावर ठेवून नीट कोरड्या करा. ओलसर भाज्या लवकर खराब होतात. फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी त्या टॉवेलने पुसून कोरड्या करा.

फ्रीजचा योग्य वापर करा : घरातील रेफ्रिजरेटर अर्थात फ्रीजचे तापमान 1 ते 4 अंश सेल्सिअस ठेवा. यामुळे भाज्या ताज्या राहतील.

भाज्यापेपर टॉवेल वापरा : भाज्या, फळं ठेवण्याआधी ते पेपर टॉवेलमध्ये गुंडाळा. त्यामुळे अतिरिक्त ओलावा शोषला जाईल आणि भाज्या ताज्या राहतील.

 मोकळ्या ठेवा: भाज्या एकमेकांच्या वर ठेवू नका. हवा लागेल अशा पद्धतीने त्या मोकळ्या ठेवाव्यात.

भाज्या वेगळ्या ठेवा : सर्वच भाज्या फ्रीजमध्ये ठेवायची गरज नसते. कांदे, बटाटे तसेच टोमॅटो, काकडी यांसारख्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवू नका. बाहेर मोकळ्या हवेत त्या जास्त ताज्या राहतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button