breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री; दिला गंभीर इशारा

मुंबई |

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. सोमय्यांच्या रडारवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ आहेत. सोमय्यांनी एक ट्विट करत हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या मुलासह ७ जणांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे.

किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुश्रीफांवर जोरदार निशाणा साधत इशारा दिला आहे. सोमय्या म्हणतात, हसन मुश्रीफ परिवार १५८ कोटींचा घोटाळा… हसन मुश्रीफ यांचा मुलगा, दामाद, आणि इतर सात जणांविरुद्ध पोलिस एफआयआर नोंदवतील. चौकशी व कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. ईडी आणि आयकर विभागांनी कठोर कारवाई यासाठी मी पाठपुरावा करत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांवर आरोप-प्रत्यारोपही होताना दिसत आहे. अशात भाजपचे किरीट सोमय्या यांनी यापूर्वीही राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर घोटाळ्याचे गंभीर आरोप केलेत. काही दिवसांपूर्वी सोमय्या अनिल परब यांच्या रिसॉर्टचं बांधकाम तोडण्यासाठी दापोलीला रवाना झाले होतं. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला थेट इशाराही दिला होता. दरम्यान सोमय्यांनी ट्विट करत हसन मुश्रीफ परिवारावर १५८ कोटींचा घोटाळयाचा आरोप करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button