breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

#War Against Corona : सायबर गुन्ह्यासंदर्भात कोणाचीही गय केली जाणार नाही; १९ नवीन गुन्हे दाखल: विशेष पोलीस महानिरीक्षक

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

महाराष्ट्र सायबरची लॉकडाऊनच्या काळात प्रभावी कारवाई सुरू असून  कोणाचीही गय केली जाणार नाही  संबंधितांविरुद्ध कडक  कारवाई केली जाईल असे  साहेबांचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी  कळविले आहे .

१३२ गुन्हे दाखल. 

सध्या कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत .महाराष्ट्र सायबर, या गुन्हेगारांना व समाजकंटकांना पकडण्यासाठी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर समन्वय साधून काम करत आहे . महाराष्ट्र सायबर या करिता टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे.

 ७ एप्रिल पर्यंत चे गुन्हे

राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये नविन १९ असे  ७ एप्रिल २०२० पर्यंत एकूण १३२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये बीड १६, कोल्हापूर १३,पुणे ग्रामीण ११, मुंबई ९, जालना ८, सातारा ७, जळगाव ७ , नाशिक ग्रामीण ६ , नागपूर शहर ४ , नाशिक शहर ५, ठाणे शहर ४, नांदेड ४, गोंदिया ३, भंडारा ३ , रत्नागिरी ३, परभणी २, अमरावती २, नंदुरबार २, लातूर १, उस्मानाबाद १,हिंगोली १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे .

    या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी ७९ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी २४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,titktok विडिओ शेअर प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर  द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत व  त्यामध्ये आतापर्यंत ३५ आरोपींना अटक केली आहे .  

राज्यात काल  विविध  जिल्ह्यात कोल्हापूर,बीड ,जालना ,हिंगोली ,जळगाव ,उस्मानाबाद  या सर्व ठिकाणी नवीन गुन्ह्यांची नोंद झाली आहे .या गुन्ह्यांमध्ये आरोपीनी आपल्या फेसबुक /व्हाट्सअँप  व अन्य सोशल मीडियाचा (social media )वापर करून कोरोना महामारीला धार्मिक रंग देऊन आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या , ज्यामुळे त्या परिसरात अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

सतर्कता बाळगावी

     सध्या या लॉकडाऊनच्या काळात काही नवीन प्रकारच्या  सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे . कोणत्या ही वस्तूंची ऑनलाईन  ऑर्डर करताना, बऱ्याचदा एका खोट्या संकेत स्थळावर (website ) वर तुम्हाला डायरेक्ट केले जाते व मोबाईल नंबर विचारला जातो आणि मोबाईल नंबर एंटर केल्यावर एक कॉल येतो व त्या संकेतस्थळावरील (website ) एक फॉर्म भरायला सांगितलं जातो ज्यामध्ये बँक अकॉउंटचे सर्व डिटेल्स,क्रेडिट/ डेबिट कार्ड ची सर्व माहिती विचारली जाते .त्यांनतर फोन वरील व्यक्ती आपल्या मोबाइलवर येणारा  otp कन्फर्म (confirm) करायला सांगते आणि कॉल डिस्कनेक्ट होतो व काही वेळात ग्राहकाला आपल्या बँक खात्यातून रक्कम डेबिट झाल्याचा मेसेज येतो.  सर्व नागरिकांनी अशी online खरेदी करताना सतर्कता बाळगून आपले कोणतेही बँक डिटेल्स शेअर करू नयेत व असे काही घडल्यास आपल्या बँकेच्या हेल्पलाईनवर बँकेला तात्काळ कळवून आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी ,तसेच सदर गुन्ह्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेत स्थळावर (website ) पण कळवावी. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना सूचित करते की कोरोना व्हायरस संदर्भात अफवा पसरविणे ,खोटी/चुकीची माहिती सोशल मीडिया वर प्रसारित करणे अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल व त्यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही . त्यामुळे सर्व नागरिकांनी अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यापासून अलिप्त राहावे .

महाराष्ट्र सायबर सर्व नागिरकांना आवाहन करते की कृपया कोणीही अफवा व खोट्या बातम्या whatsapp किंवा अन्य समाज माध्यमांवर (social media)पसरवू नयेत, व त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. तसेच काही मदत लागल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करावे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button