ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

#AurangabadPolice : औरंगाबाद शहरात एकाच वेळी ३७ तलवारी कुरियरने;’असा’ सुरू होता ‘तलवार बाजार’

औरंगाबाद |  औरंगाबाद शहरात चार दिवसांपूर्वी एकाच वेळी ३७ तलवारी कुरियरने मागवण्यात आल्या. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर या तलवारी जप्त करण्यात आल्या होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारी कुरिअरने मागवल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि तलवार मागवणाऱ्या एकाला अटक केली आहे. विशेष म्हणजे ऑनलाइन पद्धतीने सहाशे ते आठशे रुपयांत खरेदी केलेली तलवार तीन ते साडेतीन हजार रुपयाला हा आरोपी विक्री करत असल्याचे सुद्धा तापसात समोर आले आहे.

शहरात कुरिअरने तलवारी आल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर औरंगाबाद शहर पोलिसांनी गेल्या आठवड्यात निराला बाजार येथील डीटीडीसी कुरिअरच्या कार्यालयावर छापा टाकत ३७ तलवारी जप्त केल्या होत्या. मात्र त्यावर दिलेले पत्ते आणि मोबाइल नंबर बनावट असल्याचे समोर आले होते. मात्र पोलिसांनी तांत्रिक दृष्टीने तपास करत जयसिंगपुऱ्यात राहणाऱ्या अबरार शेख जमिल उर्फ शाहरुख याला ताब्यात घेतले. त्यानेच ऑनलाइन तलवारी मागवल्या असल्याचे कबूल केले आहे. विशेष म्हणजे कारवाई पूर्वी सुद्धा त्याने पाच तलवारी मागवल्या होत्या.

अबरार हा ६०० ते ८०० रुपयांना ऑनलाइन तलवार मागवायचा. तीच तलवार तो शहरात तीन ते साडेतीन हजार रुपयांना विकत होता. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याने शहरातील शेख उबेद शेख नजीर ( रा. जयसिंगपुरा रोड ) आणि दानिश खान अब्दुल समद खान ( रा. बिस्मिल्लानगर हर्सूल ) यांना प्रत्येकी एक तलवार विकल्याचं सांगितले. त्यानंतर या दोघांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे तलवारी मागवणारा आरोपी अबरार हा मजुरीचं काम करतो.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button