breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

पुण्यात शिवसेनेला भगदाड! जिल्हाप्रमुखाचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे : पुणे जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे तसेच जयश्री पलांडे यांच्यासह जवळपास १०० ते १५० शिवसेना उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात केंद्रीय मंत्री नारायण राणे व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे तसेच जयश्री पलांडे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.

जयक्षी पलांडे यांच्या भाजप घरवापसीमुळे आता शिरूर-हवेली व आंबेगाव-शिरूरमध्ये भाजपाचाच आमदार निवडून येण्याबाबत आम्ही निश्चित झालो असून, लवकरच पक्षाचा भव्य मेळावा शिरूरमध्ये घेण्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button