breaking-newsताज्या घडामोडीपुणे

संपूर्ण देशात लॉकडाऊन, सांगोलामध्ये पार पडली बैलगाडा शर्यत

संयोजकसह अज्ञात दहा बैलगाडी चालकांवर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कोरोनाच्या फैलावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. नियमांना पायी तुडवत सांगोला तालुक्यातील घेरडी इथे बैलगाडी आणि घोडागाडी शर्यत पार पडली. या शर्यतीवेळी कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या घोडागाडी व बैलगाड्यांची शर्यत आयोजित केल्याप्रकरणी संयोजक संतोष नामदेव खांडेकर या घेरडी तालुका सांगोला यांच्यासह अज्ञात दहा बैलगाडी चालाकांवर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरातच बसण्याचे आवाहन केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने घोडागाडी व बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली असताना या आदेशाचा भंग करत ऐन संचारबंदी काळात 31 मार्च रोजी सांगोला तालुक्यातील घेरडी येथे 5 बैल व घोडा जोडीच्या गाड्यांची शर्यत घेत साधारणतः सहा किमी पळवले होते. बैल व घोडा जोडीच्या गाड्या जोरात पळविण्यासाठी चाबकाने मारण्याचा प्रकार घडला आहे. सदर घडनेची माहिती मिळताच सांगोला पोलीस ठाण्यात शर्यीतीचे आयोजक संतोष नामदेव खांडेकरसह अज्ञात 10 चालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button