breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

फ्रान्स करणार महाराष्ट्रात ५७०० कोटींची गुंतवणूक!

१४ फेंच कंपन्या महाराष्ट्रात करणार गुंतवणूक

मुंबई : फ्रान्स महाराष्ट्रात ५७०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रात थेट ५३०० नोकऱ्या निर्माण होणार आहेत. ‘इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स’ ने आयोजित केलेल्या ‘इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र’ परिषदेत यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. भारतीय आणि Foreign Investment फेंच कंपन्यांनी महाराष्ट्रात नवीन कारखाने उभारण्यासाठी आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. १४ फेंच कंपन्या महाराष्ट्रात ५७०० कोटींची गुंतवणूक करणार असून यामुळे ५३०० नोकऱ्या निर्माण होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार होण्यासाठी महाराष्ट्राचा मोठा वाटा असणार असून राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी फेंच कंपन्यांचे सहकार्य नक्कीच मोलाचे ठरेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button