breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

कपिल देवने भारत-पाक मॅचचा प्रस्ताव फेटाळला

नवी दिल्ली । काेराेना व्हायरसबाधितांवरील उपचारासाठी अामच्याकडे पैसे आहेत. त्यामुळे आम्हाला आर्थिक नड नाही. यातूनच काेणत्याही प्रकारच्या अार्थिक मदतीसाठी भारत-पाक सामन्यांचे अायाेजन करण्यात येऊ नये, अशा शब्दांत भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी पाकच्या अख्तरला चांगलेच सुनावले.

महामारीच्या विळख्यात सापडल्याने माेठ्या संख्येत नागरिकांना बाधा झाली आहे. या सर्वांच्या उपचारासाठी माेठ्या प्रमाणात खर्चाची गरज आहे. अशासाठी आता भारत आणि पाकिस्तान या दाेन्ही संघांचे तीन सामने अायाेजित करण्यात यावेत. यातून जमा झालेल्या पैशाची देणगी काेराेनाग्रस्तांना देण्यात यावी, असा सल्ला पाकिस्तानचा माजी वेगवान गाेलंदाज शाेएब अख्तरने दिला हाेता. मात्र, याला भारताचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी चांगलीच चपराक लावली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button