breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबईत 3,876, पुण्यात 6,046 नवे रुग्ण; राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 43,43,727 वर

मुंबई – राज्यात कडक निर्बंध लावलेले असतानाही कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड झपाट्याने वाढतेय. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, वारंवार हात धुवणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रात सोमवारी दिवसभरात 48,700 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 524 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 71,736 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 43,43,727 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 65,284 इतका झाला आहे. त्याचबरोबर राज्यात आतापर्यंत 36,01,796 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या 6,74,770 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मागील चार आठवड्यांपासून सलग पाच हजारांहून अधिक विक्रमी दैनंदिन रुग्णवाढ होत होती. मात्र काल मुंबईला काहीसा दिलासा मिळाला. कारण काल दिवसभरात मुंबईत 3,876 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 70 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 9,150 जणांनी कोरोनावर मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 6,31,527 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 12,853 इतका झाला आहे, तर आतापर्यंत 5,46,861 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 70,373 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच पुणे जिल्ह्यात सोमवारी 6,046 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 7,99,232 वर पोहोचली असून काल दिवसभरात 151 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा 12,457 इतका झाला आहे. तसेच काल 8,823 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली, यासह पुण्यात आतापर्यंत 6,88,158 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये 2,538 पुणे शहरातील, 1,293 पिंपरी-चिंचवडमधील, 1,884 ग्रामीण भागातील व उरलेल्या कंटेनमेंट झोनमधील रुग्णांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button