Uncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोरोना लसींच्या किमती कमी करण्याचे सिरम आणि भारत बायोटेकला निर्देश

नवी दिल्ली – भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्यातच कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहे. भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या दोन कंपन्यांची लस सध्या नागरिकांना दिली जात आहे. या कंपन्यांनी 1 मे 2021 पासून ही लस भारतीय बाजारात येणार असल्याचे घोषित केले तसेच या लसींच्या किमतीही जाहीर केल्या.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड ही लस केंद्र सरकारला 150 रुपयांना, राज्य सरकारला 400 रुपयांना तर इतर खाजगी रुग्णालयांना 600 रुपयांना देण्याचं कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस राज्य सरकारला 600 रुपयांना तर खाजगी रुग्णालयांना 1200 रुपयांना दिली जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

दरम्यान, या लसींच्या किमतीवरून राज्य सरकारने केंद्र सरकारला किमती कमी करण्यासंदर्भात विनंती केली होती. तसेच यावरून अनेक राजकीय टीकाटिप्पणीलाही मोठ्या प्रमाणात उधाण आल्याचं पाहायला मिळालं. मात्र, आता केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करत भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट यांच्याशी चर्चा करून कोरोना लसीच्या किंमती करण्याबाबत विचारणा केली आहे.

महाराष्ट्रात सोमवारी देशपातळीवर लसीकरणाचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. तब्बल पाच लाखांहून अधिक नागरिकांना एका दिवसात लस देण्यात आल्याने महाराष्ट्र राज्य लसीकरणात अग्रेसर असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button