breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सांडपाणी व्यवस्थापनावर मार्ग शोधा, नगरसेवक संदीप वाघेरे यांची मागणी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील स्टॉर्म वॉटर लाईन, ड्रेनेज लाईनची दुरूस्ती करण्याची मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.

यासंदर्भात वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडमधील नाल्यांतून वाहणारे दुर्गंधीयुक्त दुषीत पाणी पवना, इंद्रायणी व मुळा नदीपात्रात जाऊन मिसळते. त्यामुळे प्रदुषणात वाढ होऊन त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

स्टॉर्म वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन बुजल्या गेल्या आहेत. त्याची देखभाल दुरूस्ती वेळेवर होत नाही. पावसाचे पाणी या नलीकेद्वारे वाहून न जाता थेट नदी पात्रात जाऊन मिसळते. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या भीषण झळा सोसाव्या लागत आहेत. नैसर्गीक जलस्त्रोत नाहिशे होत चालले आहेत. याचा गांभीर्याने विचार करून सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न कायमचा सोडविण्यात यावा. तसेच, पावसाचे पाणी रेन वॉटर हार्वेस्टींग आणि तत्सम उपक्रमांद्वारे जमीनित जिरवून नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button