breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्राने नोंदवला एका दिवसातील कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम

मुंबई – महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णसंख्या अनेक काही दिवसांपासून झपाट्याने वाढत असल्याचे भयावह चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांवरही मोठ्या प्रमाणात ताण आल्याचं दिसून येत आहे. मात्र महाराष्ट्रात लसीकरण मोहीमही जोरदार सुरू आहे. लसीकरणाचा वेग वाढवल्याने महाराष्ट्राने आता नवा विक्रम नोंदवला आहे.

महाराष्ट्रात दररोज लाखोंच्या संख्येमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. त्यातच सोमवारी महाराष्ट्राने तब्बल 5 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन देशपातळीवर नवा विक्रम नोंद केला आहे. गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्याही हळूहळू कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरणाच्या मोहिमेत नवा विक्रम नोंदवल्याबद्दल अभिनंदन केले आहे. 3 एप्रिल रोजी जवळपास 4 लाख 62 हजार 735 नागरिकांचं लसीकरण करून महाराष्ट्राने यापूर्वी देशपातळीवरील विक्रम नोंदवला होता. परंतु, सोमवारी 5 लाखांचा टप्पा पार केल्याने दिवसेंदिवस लसीकरण मोहीम जोर धरत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

लसीकरणाला सुरुवात झाल्यापासूनच महाराष्ट्र राज्य हे इतर राज्यांच्या तुलनेत नेहमीच अग्रेसर राहिलं आहे. येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस मोफत मिळणार असल्याची नुकतीच घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकारी तिजोरीवर ताण पडत असला तरी नागरिकांचा जीव वाचवणं ही सरकारची प्राथमिकता असल्याचं स्पष्ट होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button